पशुसंवर्धनच्या राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण
योजनेंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड , दि. 5 :- जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयाकडून
सन 2017-18 मध्ये राबविण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय नाविन्यपुर्ण योजनेंतर्गत दुधाळ
संकरीत गाई, म्हशी, शेळी, मेंढी वाटप व कुक्कुटपालन व्यवसाय सुरु करण्यासाठी सोमवार
10 जुलै ते बुधवार 9 ऑगस्ट 2017 या कालावधीत सर्वसाधारण व अनुसुचित जाती, अनुसुचित
जमाती योजनेस पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
विहित नमुन्यातील अर्ज
आवश्यक त्या कागदपत्रासह जवळच्या पशुवैद्यकीय संस्थेमार्फत पशुधन विकास अधिकारी
(विस्तार) पंचायत समिती, पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी- 1 संबंधीत तालुका यांचेकडे
बुधवार 9 ऑगस्ट 2017 पर्यंत सादर करावीत. अधिक माहितीसाठी संबंधीत पशुवैद्यकीय
दवाखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त नांदेड यांनी
केले आहे.
दुधाळ संकरीत
गाई, म्हशीचे वाटप करणे : महिला बचतगट, अल्पभुधारक एक हेक्टर ते दोन हेक्टर
पर्यंत, रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात
नोंद असलेले सुशिक्षित बेरोजगार, लाभार्थ्यांनाच या योजनेसाठी प्राधान्य राहील.
यापुर्वी अर्ज केलेले परंतु त्याची निवड व प्रतीक्षा यादीमधून संधी उपलब्ध न
झालेले पात्र लाभार्थी देखील विचारात घेतले जातील. सर्वसाधारण प्रवर्गासाठी 50
टक्के शासकीय अनुदान, अनुसुचित जातीचे लाभार्थ्यांना 75 टक्के शासकीय अनुदान
राहील.
अंशत: ठाणबंद
पद्धतीने संगोपन करण्यासाठी दहा शेळ्या, मेंढ्या व एक बोकड, नर मेंढा याप्रमाणे
लाभार्थ्यांना शेळी / मेंढी गट वाटप करणे : दारिद्रय रेषेखालील, अत्यल्प भुधारक
शेतकरी एक हेक्टर पर्यंत. अल्पभुधारक शेतकरी
एक ते दोन हेक्टर पर्यंत, रोजगार व
स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले सुशिक्षित बेरोजगार, महिला बचतगटातील लाभार्थी या
योजनेसाठी प्राधान्य राहील. यापुर्वी दारिद्रयरेषेखालील अर्ज केलेले परंतु त्याची
निवड व प्रतीक्षा यादीमधून संधी उपलब्ध न झालेले पात्र दारिद्रयरेषेखालील लाभार्थी
देखील विचारात घेतले जातील. सर्वसाधारण प्रवर्गासाठी 50 टक्के शासकीय अनुदान,
अनुसुचित जाती / जमातीचे लाभार्थ्यांना 75 टक्के शासकीय अनुदान राहील.
एक हजार मांसल
कुक्कुट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कुटपालन व्यवसाय सुरु करणे : अत्यल्प भुधारक शेतकरी
एक हेक्टर पर्यंत, अल्प भुधारक शेतकरी एक ते दोन हेक्टर पर्यंत, रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले
सुशिक्षित बेरोजगार, महिला बचत गटातील लाभार्थी यांना या योजनेसाठी प्राधान्य
राहील. सर्वसाधारण प्रवर्गासाठी 50 टक्के शासकीय अनुदान, अनुसुचित जाती / जमातीचे लाभार्थ्यांना
75 टक्के शासकीय अनुदान राहील.
000000
No comments:
Post a Comment