फिरत्या
लोकन्यायालयात वाद मिटविण्याचे आवाहन
नांदेड दि. 5 :- छोटया-छोटया गोष्टींमुळे होणारे वाद वर्षानुवर्षे न्यायालयात प्रलंबित ठेवून वेळ वाया न घालवता पक्षकारांनी या फिरत्या लोकन्यायालयात आपले आपसातील वाद सामोपचाराने मिटविण्याचे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश सविता बारणे यांनी केले.
फिरत्या लोकन्यायालयाचे उद्घाटन प्रमुख जिल्हा न्यायाधीश सविता बारणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे करण्यात आले.
प्रमुख जिल्हा न्यायाधीश सविता बारणे यांनी ‘‘न्याय आपल्या दारी’’ या संकल्पनेतील फिरत्या लोकन्यायालयाच्या वाहनाचे उद्घाटनानंतर जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्यास शुभेच्छा दिल्या. त्यानंतर न्यायालयातील प्रलंबित असलेल्या प्रकरणांपैकी काही प्रकरणे या फिरत्या लोकन्यायालयाच्या उद्घाटन प्रसंगी तडजोडीने निकाली काढण्यासाठी ठेवण्यात आली होती.
यावेळी जिल्हा न्यायाधीश एस. आर. जगताप, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डी. टी.वसावे, जिल्हा सरकारी वकील अॅड. अमरिकसिंघ वासरीकर, अभिवक्ता संघाचे अध्यक्ष अॅड. मिलींद एकताटे, उपाध्यक्ष अॅड. जगजीवन भेदे यांची प्रमुख उपस्थिती
होती.
सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश भीमराव नरवाडे यांनी या फिरत्या लोकन्यायालयाचा पुर्वीचा अनुभव सांगितला. तसेच यापुढेही पक्षकारांनी फिरत्या
लोकन्यायालयाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
प्रास्ताविकात जिल्हा
विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. वसावे यांनी फिरते लोकन्यायालयाची व कायदे विषयक शिबीराची संकल्पना, महत्व, उद्देश व त्यामागची भुमिका सांगितली.
राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये 5 ते 30 जुलै 2017 या कालावधीत जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात काही गावांमध्ये फिरत्या लोकन्यायालयाचे व शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हयातील सर्व तळागाळापर्यंतच्या नागरिकांना या फिरत्या लोकन्यायालयाचा लाभ घेता यावा या हेतुने ही योजना राज्यात राबविण्यात येत आहे.
सुत्रसंचलन जिल्हा
न्यायाधीश श्रीमती एस. एस. तोडकर यांनी केले तर अॅड.
नय्युम खान पठाण, यांनी आभार मानले.
यावेळी जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश, न्यायालयीन व्यवस्थापक एम. के.आवटे तसेच न्यायालयीन कर्मचारी, विधिज्ञ, पक्षकार मोठया संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमानंतर जिल्हा न्यायालयाच्या प्रांगणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सर्व न्यायाधीश, अभिवक्ता संघाचे अध्यक्ष अॅड. मिलींद एकताटे, अॅड.
अमरिकसिंघ वासरीकर, अॅड.
आर. जी. परळकर व इतर ज्येष्ठ विधिज्ञ तसेच न्यायालयीन कर्मचारी यांनी वृक्षारोपण केले.
00000
No comments:
Post a Comment