सामाजिक
न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचा दौरा
नांदेड, दि. 9 :- राज्याचे
सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, भुकंप पुनर्वसन, अल्पसंख्याक
विकास व वक्फ राज्यमंत्री दिलीप कांबळे हे शनिवारी नांदेड दौऱ्यावर येत असून
त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शनिवार 11 मार्च 2017
रोजी पुणे येथून पनवेल-नांदेड रेल्वेने सकाळी 9.25 वा. नांदेड रेल्वे स्टेशन येथे
आगमन व शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. सकाळी 9.35 वा. शासकीय
विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सकाळी 10.45 वा. शंकरराव चव्हाण सभागृह नांदेड
येथे आगमन . सकाळी 11 वा. सामाजिक न्याय विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या लोकशाहीर
अण्णाभाऊ साठे, कर्मवीर दादासाहेब गायकवाड व संत रोहिदास राज्यस्तरीय पुरस्कार
वितरण सोहळा कार्यक्रमास उपस्थिती. सोईनुसार नांदेड येथून शासकीय वाहनाने लातूरकडे
प्रयाण करतील.
000000
No comments:
Post a Comment