Thursday, March 9, 2017

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या
राज्यस्तरीय पुरस्कारांचे आज नांदेडमध्ये वितरण
संत रविदास, कर्मवीर दादासाहेब गायकवाड, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्कार
नांदेड, दि. 10 :- राज्याच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या संत रविदास पुरस्कार, पद्मश्री  कर्मवीर  दादासाहेब गायकवाड पुरस्कार आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार यांचे उद्या शनिवार 11 मार्च 2017 रोजी नांदेड येथे वितरण होणार आहे. पुरस्कारांचे वितरण राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते आणि वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य विकास राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जून खोतकर  यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे सकाळी 11 वा. वितरण सोहळा होणार आहे.
सोहळ्यासाठी राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, भुकंप पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास व वक्फ राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची विशेष उपस्थिती राहणार आहेत. सोहळ्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती मंगलाताई गुंडले, खासदार अशोकराव चव्हाण, खासदार राजीव सातव, खासदार डॉ. सुनिल गायकवाड, नांदेड शहराच्या महापौर श्रीमती शैलजा स्वामी, आमदार अमरनाथ राजुरकर, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, आमदार डी. पी. सावंत, आमदार वसंत चव्हाण, आमदार प्रदीप नाईक, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार सुभाष साबणे, आमदार सौ. अमिता अशोकराव चव्हाण, आमदार हेमंत पाटील , आमदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार डॉ. तुषार राठोड हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्यास उपस्थित रहावे, असे आवाहन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सचिव डॉ. सुरेंद्रकुमार बागडे आणि राज्याचे समाज कल्याण आयुक्त पीयूष सिंह यांनी केले आहे. निमंत्रितांनी कार्यक्रमाच्या वेळपुर्वी 15 मिनिटे आगोदर सभागृहात उपस्थित रहावे. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टिने हॅंडबॅग अथवा तत्सम वस्तू सोबत आणू नयेत , अशी विनंती संयोजकांच्यावतीने करण्यात आली आहे.  

000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...