जि.प.,
पं.स. निवडणुकीसाठी
मतदानास उत्साहात
प्रांरभ
जिल्हाधिकारी काकाणी
यांच्याकडून मतदान केंद्रांची पाहणी
नांदेड दि. 16
:- जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाला आज सकाळी
जिल्ह्यात सुनियोजिरित्या प्रारंभ झाला. जिल्हा परिषदेचे 63 गट आणि पंचायत
समितीच्या 126 गणांसाठी जिल्ह्यातील 2 हजार 93 मतदान केंद्र स्थापन करण्यात आली
आहेत. या मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी सकाळपासूनच मतदारांचा चांगला उत्साह
राहीला. जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी मतदान केंद्रांना भेट देऊन, तेथील
व्यवस्थेची पाहणी केली.
दुपारपर्यंतच्या
आकडेवारीनुसार जिल्ह्यात सरासरी सुमारे 37.66 टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा
परिषद व पंचायत समिती निवडणूक विभागाने दिली.
जिल्हा परिषदेच्या 63
गटांसाठी 374 तर पंचायत समितीच्या 126 गणांसाठी 603 उमेदवार रिंगणात आहेत. मतदानासाठी
पात्र मतदारांची संख्या 16 लाख 94 हजार 705 इतकी आहे. त्यामध्ये 8 लाख 90 हजार 332
मतदार पुरूष आणि 8 लाख 4 हजार 363 मतदार स्त्रिया आहेत, तर दहा मतदार इतर म्हणून
नोंदणी केलेले आहेत. जिल्ह्यात 57 मतदान केंद्र संवेदनशील आहेत. या संवेदनशील
मतदान केंद्रांसह जिल्ह्यात सर्वत्र पोलिस, राज्य राखीव दल, दंगल नियंत्रण पथक
तसेच गृहरक्षक यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
जिल्ह्यात आज सकाळी
मतदानास प्रारंभ झाला. सकाळच्या पहिल्या प्रहरापासूनच मतदानासाठी मतदारांत उत्साह
दिसून आला. त्यामुळे मतदान केंद्रावर रांगा लागल्याचे चित्र होते. यात नवमतदार
तसेच ज्येष्ठ मतदारांचीही संख्याही लक्षवेधी होती.
जिल्हाधिकारी सुरेश
काकाणी यांनी नांदेड तालुक्यातील वाडी बु. आणि विष्णुपूरी अंतर्गत येणाऱ्या मतदान
केंद्रांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. मतदारांसाठीच्या आवश्यक सुविधा, तसेच अनुषंगीक
बाबींबाबत त्यांनी मतदान अधिकारी-कर्मचाऱ्यांना निर्देश दिले. वाडी बु.मधील टायनी
एंजेल्स हायस्कुलमधील मतदान केंद्र, तसेच नांदेड-पुर्णा मार्गावरील नवीवाडी येथील जिल्हा
परिषद प्राथमिक शाळेतील मतदान केंद्र, विष्णपुरीतील जिल्हा परीषद प्रशालेतील मतदान
केंद्रांना जिल्हाधिकारी काकाणी यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी मतदारांशीही संवाद
साधला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी हेही
उपस्थित होते.
सकाळच्या प्रहरानंतरही
मतदानासाठी रांगा लागल्याने, मतदान केंद्रावर उत्साहाचे चित्र होते.
000000
No comments:
Post a Comment