यशासाठी संकल्पना समजून घेऊन
परीक्षेची तयारी करावी - चोपडे
नांदेड दि. 15 :- स्पर्धा
परीक्षेची तयारी करीत असताना फक्त पाठांतर न करता त्या विषयातील संकल्पना समजून
घेऊन परीक्षेची तयारी
केल्यास यश निश्चित मिळते त्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वत:च्या नोटस
काढाव्यात, असे प्रतिपादन शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक वी. वी. चोपडे
यांनी केले.
उज्ज्वल नांदेड मोहिमेअतंर्गत जिल्हा प्रशासन व पिपल्स कॉलेज आणि यशवंत महाविद्यालय यांचे
संयुक्त विद्यमाने आयोजित
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
करताना ते बोलत होते.
श्री. चोपडे पुढे म्हणाले की , विद्यार्थ्यांनी आपले प्रयत्न प्रामाणिक ठेऊन
स्वत:चे अस्तित्व जपणे आवश्यक असून अभ्यास करताना एका विषयाचे दहा पुस्तके वाचण्यापेक्षा त्या विषयाचे एक पुस्तक दहा वेळा वाचल्यास ते खूप उपयोगी सिध्द होईल. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना पीसएसआय परीक्षेविषयी माहिती
देऊन मैदानी परीक्षा व मुलाखत याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले. जिल्हा
ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी दोन्ही महाविद्यालयातील कार्यक्रमाचे प्रास्ताविक
केले. पीपल्स कॉलेजमध्ये समन्वयक
प्रा. श्रीकांत
देशमुख यांनी तर यशवंत महाविद्यालयामध्ये समन्वयक
प्रा. बोरकर
यांनी आभार मानले.
000000
No comments:
Post a Comment