Wednesday, February 15, 2017

जि.प., पं.स. निवडणुकीसाठी आज जिल्ह्यात
2 हजार 93 केंद्रावर मतदान, चोख पोलीस बंदोबस्त
शांतता, सुव्यवस्थेचे जिल्हाधिकारी काकाणी यांचे आवाहन

नांदेड दि. 15 :- जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवार 16 फेब्रुवारी 2017 रोजी मतदान होणार आहे. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक यंत्रणेने पुर्ण सज्जता ठेवली असून, मतदान केंद्रावर निवडणूक साहित्य सुनियोजितपणे पोहचविण्यात आले आहे. मतदान निर्भय, शांतता आणि सुव्यवस्थेत पार पडावे यासाठी पोलीस दलानेही पुरेसा बंदोबस्त ठेवला आहे. मतदान प्रक्रियेसाठी जिल्ह्यात सुमारे 9 हजार 440 अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या 63 गटांसाठी आणि पंचायत समितीच्या 126 गणांसाठी होणाऱ्या मतदानासाठी जिल्ह्यात 2 हजार 93 मतदान केंद्र सुनिश्चित करण्यात आली आहेत. यापैकी 57 मतदान केंद्र संवेदनशील असल्याने, निवडणूक यंत्रणा व पोलिस यंत्रणेने त्यासाठी काटेकोर उपाय योजना केल्या आहेत. जिल्ह्यात मतदानासाठी पात्र मतदारांची संख्या 16 लाख 94 हजार 705 इतकी आहे. त्यामध्ये 8 लाख 90 हजार 332 मतदार पुरूष आणि 8 लाख 4 हजार 363 मतदार स्त्रिया आहेत, तर दहा मतदार इतर म्हणून नोंदणी केलेले आहेत.
जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया शांततेत व सुव्यवस्थेत पार पाडावी यासाठी जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी विविध यंत्रणांचा आढावा घेतला. मतदानासाठीचे साहित्य, वाहतूक सुविधा याबाबत समन्वय राखण्याबाबत त्यांनी निर्देश दिले. मतदारांनी निर्भय आणि कोणत्याही आमिषाला बळी न पडता, गैरप्रकारांच्या प्रभावाखाली न येता मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
मतदानासाठी जिल्ह्यातील मतदान केंद्रासाठी 5 हजार 38 ईलेक्ट्रॅानिक मतदान यंत्र पुरविण्यात आली आहेत. तालुका निहाय जिल्हा परिषद गटासाठीचे उमेदवार पुढील प्रमाणे (कंसात गटांची संख्या) माहूर- 10 (2)  , किनवट-  48 (6) , हिमायतनगर  13 (2). हदगाव- 45 (6) , अर्धापूर- 12 (2) , नांदेड- 34 (4) , मुदखेड- 7 (2) , भोकर- 16 (3) , उमरी- 9 (2), धर्माबाद- 12 (2) , बिलोली- 26 (4)  , नायगाव- 21 (4) , लोहा- 28 (6) , कंधार-  29 (6), मुखेड- 33 (7) , देगलूर- 31 (5). अशारितीने जिल्हा परिषदेच्या 63 गटांसाठी 374 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
तालुका निहाय पंचायत समिती गणांसाठीचे उमेदवार पुढील प्रमाणे (कंसात गणांची संख्या) माहूर- 24 (4)  , किनवट-  73 (12) , हिमायतनगर  16 (4). हदगाव- 54  (12) , अर्धापूर- 20 (4) , नांदेड- 43 (8) , मुदखेड- 17 (4) , भोकर- 31 (6) , उमरी- 22 (4), धर्माबाद- 20 (4) , बिलोली- 36 (8)  , नायगाव- 39 (8) , लोहा- 57 (12) , कंधार-  56 (12), मुखेड- 56 (14) , देगलूर- 39 (10). अशा रितीने पंचायत समितीच्या 126 गणांसाठी 603 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
तालुकानिहाय मतदान केंद्राची संख्या (कंसात संवेदनशील मतदान केंद्रांची संख्या) पुढीलप्रमाणे - माहूर- 83 (4)  , किनवट-  191 (8) , हिमायतनगर  67 (2). हदगाव- 209   (7) , अर्धापूर- 62 (निरंक) , नांदेड- 138 (4) , मुदखेड- 74 (3) , भोकर- 97 (2) , उमरी- 76 (3), धर्माबाद- 59 (3) , बिलोली- 125 (3)  , नायगाव- 156 (1) , लोहा- 191 (9) , कंधार- 182 (4), मुखेड- 236 (निरंक) , देगलूर- 147 (4). अशारितीने एकूण 2 हजार 93 मतदान केंद्रामध्ये 57 मतदान केंद्र संवेदनशील आहेत.
मतदानासाठी नियुक्त करण्यात आलेल्या 9 हजार 440 अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये 2 हजार 303 मतदान केंद्राध्यक्ष, 6 हजार 909 मतदान केंद्राधिकारी आणि 228 क्षेत्रीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये राखीव दहा टक्के अधिकच्या मनुष्यबळाचाही समावेश आहे. या सर्व यंत्रणेला वाहतूकीसाठी आणि संपर्कासाठी सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.
निवडणुकीसाठीची मतमोजणी संबंधित तालुक्यांच्या ठिकाणी  गुरुवार 23 फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी दहा वाजेपासून सुरु होणार आहे.
मतदानासाठी जिल्ह्यात चोख बंदोबस्त
जिल्ह्यात मतदानासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रशासनाने दिली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक संजय येनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली संवेदनशील मतदान केंद्र परिसरासह, सर्वत्र पुरेसा पोलीस बंदोबस्त राहणार आहे. या बंदोबस्तासाठी 14 उपविभागीय पोलीस अधिकारी, 21 पोलीस निरीक्षक, 165 सहायक पोलीस निरीक्षक / पोलीस उपनिरीक्षक, 2 हजार 637 पोलीस कर्मचारी, 1 हजार 179 गृहरक्षक दलाचे जवान यांच्यासह राज्य राखीव दलाच्या 16 तुकड्या व दंगल नियंत्रण पथकाच्या 11 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.  

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...