Saturday, August 7, 2021

नांदेड जिल्ह्यात 2 व्यक्ती कोरोना बाधित तर 4 कोरोना बाधित झाले बरे

नांदेड (जिमाका) दि. 7 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 221 अहवालापैकी 2 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 1 तर अँटिजेन तपासणीद्वारे 1 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 211 एवढी झाली असून यातील 87 हजार 514 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 40 रुग्ण उपचार घेत असून 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 2 हजार 657 एवढी आहे. आज जिल्ह्यातील 4 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरणातील 4 व्यक्तीला सुट्टी देण्यात आली. 

आज 40 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1, किनवट कोविड रुग्णालय 2, देगलूर कोविड रुग्णालय 1, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 32, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृहविलगीकरण 5 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 132, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 145 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 6 लाख 74 हजार 79

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 5 लाख 71 हजार 764

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 211

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 514

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 657

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.01 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-44

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-26

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-40

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3.

00000

 

जिल्ह्यातील 76 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण 

नांदेड (जिमाका) दि. 7 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 76 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. रविवार 8 ऑगस्ट 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे. 

मनपा क्षेत्रातील श्री गुरु गोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, दशमेश हॉस्पिटल, श्रावस्तीनगर (विजयनगर), पौर्णिमानगर, सांगवी, खडकपुरा, करबला, अरबगल्ली, तरोडा, विनायकनगर या 12 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस तर शहरी दवाखाना जंगमवाडी येथे कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 50 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. 

याचबरोबर श्री गुरु गोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, पौर्णिमानगर, सांगवी, खडकपुरा, करबला, अरबगल्ली, तरोडा, विनायकनगर या 16 रुग्णालयामध्ये कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत.  

 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, हिमायतनगर, मांडवी, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 12 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस तर ग्रामीण रुग्णालय कंधार, लोहा या केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 50 डोस उपलब्ध करुन दिले आहेत.   

उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 16 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. तर ग्रामीण भागातील 28 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस तर 16 प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविशील्ड लसीचे 50 डोस देण्यात आले आहेत. 

वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. 

जिल्ह्यात 6 ऑगस्ट पर्यंत एकुण 8 लाख 57 हजार 134 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. नांदेड जिल्ह्यात 7 ऑगस्टपर्यत कोविड लसींचा साठा पुढीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 6 लाख 63 हजार 30 डोस, कोव्हॅक्सीनचे 2 लाख 9 हजार 360 डोस याप्रमाणे एकुण 8 लाख 72 हजार 390 डोस प्राप्त झाले आहेत. 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.

00000

Friday, August 6, 2021

नांदेड जिल्ह्यात 7 व्यक्ती कोरोना बाधित

एकाचा मृत्यू तर 6 कोरोना बाधित झाले बरे

नांदेड (जिमाका) दि. 6 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 961 अहवालापैकी 7 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 5 तर अँटिजेन तपासणीद्वारे 2 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 209 एवढी झाली असून यातील 87 हजार 510 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 42 रुग्ण उपचार घेत असून 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

शुक्रवार 6 ऑगस्ट रोजी रामनगर किनवट येथील 72 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 2 हजार 657 एवढी आहे. आज जिल्ह्यातील 6 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी येथील 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरणातील 5 व्यक्तीला सुट्टी देण्यात आली. 

आज 42 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1, किनवट कोविड रुग्णालय 2, देगलूर कोविड रुग्णालय 1, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृहविलगीकरण 5, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 33 व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 131, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 145 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 6 लाख 71 हजार 858

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 5 लाख 69 हजार 586

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 209

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 510

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 657

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-38

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-29

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-42

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3.

00000

 जिल्ह्यातील 84 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण 

नांदेड (जिमाका) दि. 6 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 84 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. शनिवार 7 ऑगस्ट 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे. 

मनपा क्षेत्रातील डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), रेल्वे हॉस्पिटल, पौर्णिमानगर, सांगवी, खडकपुरा, करबला, अरबगल्ली, तरोडा, विनायकनगर या 17 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस तर श्री गुरु गोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, शहरी दवाखाना सिडको येथे कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 50 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. 

याचबरोबर श्री गुरु गोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, रेल्वे हॉस्पिटल, पौर्णिमानगर, सांगवी, खडकपुरा, करबला, अरबगल्ली, तरोडा, विनायकनगर या 19 रुग्णालयामध्ये कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत.   

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, हिमायतनगर, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 13 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस तर ग्रामीण रुग्णालय कंधार या केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 50 डोस उपलब्ध करुन दिले आहेत.   

उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, उमरी या 15 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस तर ग्रामीण रुग्णालय नायगाव येथे कोविशील्ड लसीचे 50 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. तर ग्रामीण भागातील 43 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस तर 8 प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविशील्ड लसीचे 50 डोस देण्यात आले आहेत. 

वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. 

जिल्ह्यात 5 ऑगस्ट पर्यंत एकुण 8 लाख 58 हजार 526 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. नांदेड जिल्ह्यात 6 ऑगस्टपर्यत कोविड लसींचा साठा पुढीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 6 लाख 63 हजार 30 डोस, कोव्हॅक्सीनचे 2 लाख 9 हजार 360 डोस याप्रमाणे एकुण 8 लाख 72 हजार 390 डोस प्राप्त झाले आहेत. 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.

00000

सायलेज बेलर मशिन युनिट स्थापना योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 6 :-  जिल्ह्यात राष्ट्रीय पशुधन अभियांतर्गत विशेष घटक योजनेतून मुरघास निर्मितीसाठी सायलेज बेलर मशिन युनिट स्थापन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सहकारी उत्पादक संघ, संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, संस्था, स्वयंसहाय्यता बचतगट व गोशाळा, पांजरपोळ, गोरक्षण संस्थांना बेलर मशीन युनिट स्थापन करण्यासाठी  अर्थसहाय्य मिळणार आहे. विशेष घटक योजनेंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र संस्थेला आपले अर्ज मंगळवार 31 ऑगस्ट 2021 पर्यंत पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांच्याकडे सादर करता येतील. 

या योजनेसाठी प्रति युनीट 20 लाख रुपये खर्चापैकी 50 टक्के 10 लाख रुपये केंद्र शासनाचे अर्थसहाय्य राहणार आहे. उर्वरीत 50 टक्के 10 लाख रुपये संस्थेचे स्वत: खर्च करावयाचे आहे. हा निधी विशेष घटक योजनेतील असल्याने योजनेसाठी जिल्ह्यात एक युनिट स्थापन करावयाचे आहे, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एम. आर. रत्नपारखी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

 00000

 जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात रानभाजी महोत्‍सवाचे सोमवारी आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 6 :- जागतिक अदिवासी दिनानिमित्त सोमवार 9 ऑगस्‍ट रोजी सकाळी 10 वा. जिल्‍हाधिकारी कार्यालय परीसरात रानभाजी महोत्‍सवाचे आयोजन करण्‍यात आले आहे. या महोत्‍सवाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती मंगाराणी अंबुलगेकर यांच्‍या हस्‍ते होणार आहे. या महोत्सवात सर्व प्रकारच्या रानभाज्‍या कर्टुली, शेवगा, घोळ, चवळी, बांबूचे कोंब, दिंडा, टाळका, पिंपळ, मायाळ, पाथरी, अळु, कपाळफोडी, कुरडू, उंबर, चिवळ, भुई आवळी इ. कंदभाज्‍या व सेंद्रीय हिरव्‍या भाज्‍या, फळभाज्‍या व फूलभाज्‍या व ड्रँगन फ्रुट रानफळांची व शेतकऱ्यांनी विविध उत्‍पादीत केलेला माल, सेंद्रीय उत्‍पादने, गुळ, हळद, लाकडी घाण्‍याचे करडीचे तेल, गहू, सर्व डाळी व भुईमुगच्‍या शेंगा, मुगाच्‍या शेंगा व केळीचे वेफर्सचे प्रदर्शन व विक्री होणार आहे. कोवीड-19 च्‍या नियमांचे पालन करुन या रानभाजी महोत्सवाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले आहे. 

या महोत्सवास आमदार बालाजीराव कल्‍याणकर, आमदार मोहन हंबर्डे, जिल्‍हा परीषदेचे कृषी सभापती बाळासाहेब रावणगावकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा पदिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी,  वर्षा ठाकूर-घुगे, कृषि विज्ञान केंद्राचे शास्‍त्रज्ञ यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 

मानवी आरोग्‍यामध्‍ये सकस अन्‍नाचे अनन्‍यसाधारण महत्‍व आहे. सकस अन्‍नामध्‍ये विविध भाज्‍यांचा समावेश होतो. सध्‍याच्या परिस्थितीमध्‍ये रानातील म्‍हणजेच जंगलातील तसेच शेत शिवारातील नैसर्गिकरित्‍या उगवल्‍या जाणाऱ्या रानभाज्‍या, रानफळांचे महत्‍व व आरोग्‍यविषयक माहिती सर्वसामान्‍य नागरिकांना होणे आवश्‍यक आहे. रानभाज्‍यांचा समावेश हा त्‍या-त्‍या भागातील शेतकऱ्यांचे आहारात होत असतो. रानभाज्‍यांमध्‍ये विविध प्रकारचे शरीराला आवश्‍यक असणारे पौष्टिक अन्‍नघटक असतात. या रानभाज्‍या नैसर्गिकरित्‍या येत असल्‍यामुळे त्‍यावर रासायनिक किटकनाशक / बुरशीनाशक फवारणी करण्‍यात येत नाही. त्‍यामुळे रानभाज्या पुर्णपणे नैसर्गिक असल्‍याने या संपत्‍तीचा योग्‍य वापर आवश्‍यक आहे. शहरी लोकांमध्‍ये याबाबत जागृती होणे अत्‍यंत आवश्‍यक आहे. यासाठी जिल्‍हयात रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्‍यात येणार आहे. या महोत्‍सवामधून शहरातील ग्राहकांनी थेट शेतकऱ्याकडून रानभाजी खरेदी करावी, असे आवाहन जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्‍प संचालक (आत्‍मा) रविशंकर चलवदे यांनी केले आहे. शेतकरी गट व महिला गटांचा सक्रिया सहभाग या महोत्‍सवात असणार आहे. हा महोत्सव सोमवारी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यत सुरु राहणार आहे, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. 

00000

 

मोटार वाहन नियम सुधारणा मसुदावरील हरकती / सूचना सादर करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 6 :- महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 50 सुधारणा करण्याच्या प्रारूप नियमाचा मसुदा तयार करण्यात आला आहे. याबाबत हरकती व सूचना जनता / संस्थांकडून रविवार 15 ऑगस्ट 2021 पूर्वी येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात मागविण्यात आल्या आहेत.   

या नियमास महाराष्ट्र मोटार वाहन (तिसरी सुधारणा) नियम 2021 असे म्हणावे. महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 50 मधील उपनियम (2) ऐवजी खालील उपनियम दाखल करण्यात येईल. पुढील वाहनांच्या मालकांना अधिनियमाच्या प्रकरण चार मधील देय नोंदणी शुल्क भरण्यापासून सूट देण्यात येईल. फक्त शेतीविषयक कामाच्या वापरासाठी हेतू असणारे ट्रॅक्टर व मोटर्स, रुग्णवाहिका आणि शववाहिनी आणि इतर डिझाइन केलेली मोटार वाहने जी विनामूल्य वैद्यकीय आणि इतर मदतीसाठी विशेषत वापरली जाणारी आहेत आणि केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 2 च्या कलम  (यू) अंतर्गत परिभाषित  केलेली बॅटरीवर चालणारी वाहनाचा यात समावेश आहे.

00000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...