मोटार वाहन नियम सुधारणा मसुदावरील हरकती / सूचना सादर करण्याचे आवाहन
नांदेड (जिमाका) दि. 6 :- महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 50 सुधारणा करण्याच्या प्रारूप नियमाचा मसुदा तयार करण्यात आला आहे. याबाबत हरकती व सूचना जनता / संस्थांकडून रविवार 15 ऑगस्ट 2021 पूर्वी येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात मागविण्यात आल्या आहेत.
या नियमास
महाराष्ट्र मोटार वाहन (तिसरी सुधारणा)
नियम 2021 असे म्हणावे. महाराष्ट्र मोटार
वाहन नियम 1989 च्या नियम 50 मधील
उपनियम (2) ऐवजी खालील उपनियम दाखल
करण्यात येईल. पुढील वाहनांच्या मालकांना
अधिनियमाच्या प्रकरण चार मधील
देय नोंदणी शुल्क भरण्यापासून
सूट देण्यात येईल. फक्त
शेतीविषयक कामाच्या वापरासाठी हेतू
असणारे ट्रॅक्टर व मोटर्स, रुग्णवाहिका
आणि शववाहिनी आणि इतर
डिझाइन केलेली मोटार वाहने
जी विनामूल्य वैद्यकीय आणि
इतर मदतीसाठी विशेषत वापरली
जाणारी आहेत आणि केंद्रीय
मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 2 च्या
कलम (यू) अंतर्गत परिभाषित केलेली बॅटरीवर चालणारी
वाहनाचा यात समावेश आहे.
00000
No comments:
Post a Comment