Tuesday, December 6, 2022

 महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

 

§   समाज कल्याण कार्यालयात समता पर्वाचा समारोप

नांदेड (जिमाका) दि. 6 :-  महामानव भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त समाज कल्याण कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस सहाय्यक आयुक्त डॉ. तेजस माळवदकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

 

सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्या विद्यमाने 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2022 या कालावधीत समता पर्वानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समता पर्व कार्यक्रमा अंतर्गत समाज कल्याण कार्यालयाच्या अधिनस्त शासकीय वसतिगृह, अनु.जाती शासकीय निवासी शाळा व जवाहरलाल नेहरु समाज कार्य महाविद्यालय व संशोधन केंद्र, सिडको नविन नांदेड तसेच महात्मा फुले विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ , संत रोहीदास चर्मोद्योग विकास महामंडळ, अपंग विकास महामंडळ इतर मागासवर्गीय विकास महामंडळ या विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

समाज कल्याण अधिकारी बी.एस.दासरी यांनी संविधान प्रस्ताविकेचे सामुहिक वाचन केले. सहाय्यक लेखाधिकारी डी.वाय.पतंगे, कार्यालय अधिक्षक आर.व्ही. सुरकूटलावार, समाज कल्याण कार्यालयातील कर्मचारी तसेच समता दूत व प्रकल्प अधिकारी सुजाता पोहरे व  विविध महामंडळाचे कर्मचारी उपस्थित होते. राष्ट्रगीताने समता पर्व कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

 

कार्यक्रम यशस्वीतेसाठी समाज कल्याण निरीक्षक श्रीमती एम.पी.राठोड,  के.टी. मोरे, आर.डी.सुर्यवंशी, स.क.नि. खानसोळे पी.जी, कदम दत्ता हरी, वरिष्ठ लिपीक रमेश नागुलवार व  गंभीर शेबेटवार, रविकुमार जाधव , लिपीक दवणे दिनेश रामचंद्र, विजय गायकवाड, के.पी. जेटलावार, कैलास राठोड, संगणक ऑपरेटर रामदास पेंडकर, तालुका समन्वयक विजय माळवदकर, श्रीमती अंजली नरवाडे, शशिकांत वाघमारे, भगवान घुगे, महेश इंगेवाड, प्रमोद गायकवाड आदीनी परिश्रम घेतले.

 

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर  यांना  महापरिनिर्वाण

दिनानिमित्त जिल्हा जात पडताळणी कार्यालयात अभिवादन

  

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक विषमतेने ग्रासलेल्या भारतीय समाजाला समतेचा मार्ग दाखवला. उपेक्षित व शोषित घटकांच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करणारे व त्यांच्या उद्धारासाठी आयुष्य वेचणारे प्रज्ञासूर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती येथे आज 6 डिसेंबर 2022 रोजी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले.  समितीचे अध्यक्ष प्रकाश खपले, समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव सतेंद्र आऊलवार यांच्या हस्ते कॅडल मार्च लावून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

 

शासन निर्णय दि. 25 नोव्हेंबर 2022 अन्वये 26 नोव्हेंबर, संविधान दिन ते  6 डिसेंबर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन या कालावधीत समता पर्व आयोजित करण्यात आला होता.              डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी कार्यालयात समता पर्वाचा आज समारोप करण्यात आला. यावेळी एम. एस. मुळे, एस. जे. रणभिरकर, व्ही. बी. आडे, बी. एम. शिरगिरे, संजय पाटील, शिवाजी देशमुख, वैजनाथ मुंडे, बाबू कांबळे, सोनू दरेगावकर, मनोज वाघमारे, ओमशिवा चिंचोलकर, शंकर होनवडकर, सुनील पतंगे, अनिकेत वाघमारे, मोशीन शेख, संजय मंत्रे लहानकार यांची उपस्थिती होती.

0000

 



 जिल्ह्यातील 5111  गायवर्ग पशुधनाला लम्पी बाधा

4 लाख 26 हजार 31 पशुधनाचे लसीकरण 

 

 

नांदेड (जिमाका) दि. 6 :- गाय वर्ग पशुधनातील लम्पी आजाराचा अधिक फैलाव होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे व्यापक लसीकरणासह जनावरांच्या स्वच्छतेबाबत जनजागृती केली जात आहे. जिल्ह्यातील एकुण 222 बाधित गावात 5 हजार 111 गाय वर्ग पशुधनाला लम्पीची बाधा झाली आहे. 

आतापर्यंत 312 पशुधन मृत्यूमुखी पडले असून आजारातून बरे झालेले पशुधनाची संख्या 3 हजार 612 आहे. औषधोपचार चालू असलेले पशुधन 1193 आहे. सद्यस्थितीत लसीकरण मोठ्या प्रमाणात केले जात आहे. सद्यस्थितीत 4 लाख 26 हजार 31 प्रागतिक लसीकरण पूर्ण झाले आहे. मृत्त पशुधनाच्या लाभार्थ्यांची संख्या 140 वर पोहचली आहे. जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात उपलब्ध लसमात्रा असून पशुपालकांनी लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एम. आर. रत्नपारखी यांनी केले.

0000

 मृदा चाचणीतून शेतीत होतोय सकारात्मक बदल

-  वरिष्ठ  शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख

§  जागतिक मृदा दिन साजरा

 

नांदेड (जिमाका) दि. 6 :-  शेतकऱ्यांनी रासायनिक खते व औषधे यांचा वापर कमी करून सेंद्रिय खतांचा कार्यक्षम वापर करावा. मृदा चाचणीतून शेतीत  सकारात्मक बदल होत असल्याचे प्रतिपादन कृषि  विज्ञान केंद्र पोखर्णीचे  वरिष्ठ  शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख यांनी केले.

 

दिनांक 5 डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिनाचे औचित्य साधून जिल्हा अधिक्षक  कृषी  अधिकारी व जिल्हा मृद  सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी  व  कृषि  विज्ञान केंद्र पोखर्णी यांचे संयुक्त  विद्यमाने आत्मा कार्यालय नांदेड येथे मृदा दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोरगाव तेलंग गावचे  शेतकरी चंद्रकांत  क्षीरसागर  तर  मार्गदर्शक महणून कृषि  विज्ञान केंद्र पोखर्णीचे  वरिष्ठ  शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख,  डॉ. माणिक कल्याणकर, डॉ. संदीप  जायेभाये, डॉ. महेश अंभोरे, डॉ. गिरीश देशमुख  यांची उपस्थिती होती.

 

मृदेचे मानवाच्या जीवनातील अनन्य साधारण महत्त्व विशद करून सर्वांनी मृदा परीक्षण अहवालाप्रमाणे पिकांना खताच्या मात्रा द्याव्यात, असे श्री. देशमुख यांनी सांगितले. कृषि  पर्यवेक्षक मनोज दिकतवार यांनी  शेतकऱ्यांना मृदा दिनाचे महत्व सांगून मृदा दिन साजरा करण्याचा उद्देश स्पष्ट केला. डॉ. माणिक कल्याणकर यांनी शेतीतील मृदा नमुना कसा घ्यावा. प्रयोग शाळेमध्ये कसा पाठवावा या बाबतची माहिती सांगितली. तसेच जमिनीमध्ये  जैविक  सूक्ष्म जीवाचा  अधिवास  वाढणे  ही काळजी  गरज  असून  जैविक  संघ, ट्रायकोडार्मा आदी जैविक  संघाचा  वापर  करावा असेही सांगितले. डॉ. संदीप  जायेभाये  यांनी जमिनीचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी एकात्मिक अन्न द्रव्य व्यवस्थापन, मिश्र पीक पद्धती, आंतर पीक पद्धती  विषयी माहिती दिली.

 

डॉ. महेश अंभोरे यांनी जनावरातील  लंपी  स्किन  या विषाणूजन्य आजाराविषयी  माहिती दिली. तंत्र अधिकारी के.ए.म जाधव  यांनी शेतकऱ्यांना जमीनीला  जिवंत ठेवण्यासाठी  सेंद्रिय शेतीतील बिजामृत, जीवामृत, दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क, इत्यादी घटकांचा वापर करण्याबाबत मार्गदर्शन केले. समाजाची  शेती व जमिनीपासून नाळ तुटू नये, तसेच शेतकऱ्यांनी नियमितपणे आपल्या मातीची तपासणी करावी असेही आवाहन त्यांनी केले.  सेंद्रिय खत वापराचे फायदे, तणनाशकाचा कमी वापर, मातीचे सशक्तीकरण, नैसर्गिक शेती, झीरो बजेट शेती, गांडूळ खत निर्मिती, कृषिक अँप बद्दल माहिती यावेळी देण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते मौजे बोरगाव तेलंग गावातील उपस्थित शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिकीचे वाटप करण्यात आले.

 

कार्यक्रमाचे सूत्र संचालन कृषी सहायक  वसंत जारीकोटे  यांनी तर जिल्हा मृद सर्वेक्षण  व मृद  चाचणी  अधिकारी  प्रकाश पल्लेवाड यांनी आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी कार्यालयातील कृषी पर्यवेक्षक शिवाजी शिंदे, कृषी सहायक  दत्तात्रय चिंतावार, गजानन पडलवार, जावेद शेख, मोहन बेरजे, कराळे, श्रीमती सोनवणे यांनी परिश्रम घेतले.

00000




 समता पर्वा निमित्त विद्यार्थ्यांना डिजीटल जात वैधता प्रमाणपत्राचे वितरण

नांदेड (जिमाका) दि. 6 :- समता पर्व सप्ताहनिमित्त लोहा येथील श्री संत गाडगे महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात लोहा व कंधार तालुक्यातील इयत्ता 11 वी व 12 वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबीर नुकतेच आयोजित करण्यात आले होते. या शिबीरात विद्यार्थ्यांना जात पडताळणीबाबत मार्गदर्शन करुन विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था ( बार्टी ) पुणे यांच्या विद्यमाने समता पर्व निमित्त आयोजित मार्गदर्शन शिबिरात जात पडताळणी समितीचे सहाय्यक संशोधन अधिकारी वैजनाथ मुंडे यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी कोणकोणते कागदपत्र सादर करावेत, ऑनलाइन अर्ज कसा भरावा याबाबत सविस्तर माहिती त्यांनी दिली. इयत्ता 11 वी 12 वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षणाची तयारी म्हणून जात प्रमाणपत्र प्राप्त करून त्यानंतर जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी प्रस्ताव महाविद्यालयात स्थापन करण्यात आलेल्या "समान संधी केंद्रात" दाखल करावेत असेही त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

मंडणगड पॅटर्ननुसार सर्व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र देण्यात येईल. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरताना गोंधळून न जाता, व्यवस्थित व अचूक माहिती भरावी. जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याची प्रक्रीया सोपी आहे. सर्वांना जात वैधता कमीत कमी वेळेत देण्याचा नांदेड समितीचा प्रयत्न आहे. एकही मागास प्रवर्गातील विद्यार्थी प्रमाणपत्रापासून वंचित राहणार नाही. त्यासाठी 11 वी व 12 वी विज्ञान शाखेत प्रवेशित विद्यार्थ्यांनी 31 जानेवारीपर्यंत आपले परिपूर्ण प्रस्ताव "समान संधी केंद्रात" सादर करावेत असे आवाहन सहाय्यक संशोधन अधिकारी वैजनाथ मुंडे यांनी केले.  

समिती मार्फत अर्जदारांना ऑनलाइन पद्धतीने जात वैधता प्रमाणपत्र त्यांनी ऑनलाइन अर्जात नमूद केलेल्या ईमेल आयडी वर पाठवले जातील. ऑनलाइन प्राप्त झालेले वैधता प्रमाणपत्र संगणकावरून Adobe Reader DC या प्रणालीमध्ये ओपन करावे. त्यामुळे डिजिटल स्वाक्षरीची पडताळणी होईल. अर्जदारांना ऑनलाइन जात प्रमाणपत्र पडताळणी प्रणाली बाबत काही शंका असतील तर मुक्त शुल्क क्रमांक 18001208040 किंवा ईमेल cvcnanded@gmail.com  वर संपर्क साधावा, असेही कळविले आहे. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन प्रा. शिवाजी मोरे यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. सूर्यवंशी यांनी केले. यावेळी आनंदा कदम,  सूर्यकांत केंद्रे , एस. एम. मुंडकर , आर. जी. चौकले, के. आर. वरपडे, एस. ए. मलशेट्टे, एन. एम. हिपर्गेकर, पी.पी. विभुते यांच्यासह महाविद्यालयीन विद्यार्थी व कर्मचाऱ्याची उपस्थित होती.

0000




Monday, December 5, 2022

 राज्य सेवा हक्क आयोगामार्फत औरंगाबाद विभागातील

अधिसूचित सेवेच्या 20 लाख 58 अर्जाचा निपटारा

 

आयोगाचे आयुक्त डॉ. किरण जाधव यांनी घेतला

विविध विभागांचा वेळोवेळी आढावा 

नांदेड (जिमाका) दि. 5 :- जनतेला विहित मुदतीत सेवा देण्याबाबत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत औरंगाबाद विभागात मागील वर्षात एकूण 26 लाख 92 हजार 779 तुलनेत यावर्षी यावर्षी नोव्हेंबर 2022 अखेर 23 लाख 76 हजार  681 प्राप्त अर्जांपैकी 20 लाख 58 हजार 165 लोक सेवा हक्क अर्जांचा निपटारा करण्यात आला. राज्य सेवा हक्क आयोगाचे आयुक्त डॉ. किरण जाधव यांनी औरंगाबाद विभागातील जिल्हाधिकारी औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर, बीड, उस्मानाबाद जिल्ह्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष वेळोवेळी जाऊन सर्व विभाग प्रमुखांच्या बैठका त्यांनी घेतला. या बैठकीत राज्य सेवाहक्क आयोगाचे ब्रिदवाक्य “आपली सेवा, आमचे कर्तव्य” याची जाणीव त्यांनी करुन दिली. 

शासनाने विकसित केलेले आरटीएस महाराष्ट्र (RTS MAHARASHTRA) हे मोबाईल ॲप डाऊनलोड करुन त्याचा वापर कसा करावा याचे प्रशिक्षण दिले. आपले सरकार या पोर्टलवर सेवा मागणी करण्याबाबत जनतेत जनजागृती करण्याबाबत नियंत्रण अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांना निर्देश दिले. राज्यामध्ये नागरिकांना सेवेचा हक्क देणारा कायदा म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हा आहे. नागरिकांना पारदर्शक, गतिमान व कालबद्ध सेवा मिळण्याचा अधिकार या कायद्यान्वये प्राप्त झाला आहे. या कायद्यांचे काटेकोर अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाची स्थापना करुन सर्व महसूली विभागामध्ये डिसेंबर 2021 मध्ये राज्य सेवा हक्क आयुक्तांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 

आयोगाच्या घोषवाक्यानुसार सरंजामशाही कार्य संस्कृतीच्या मानसिकतेत बदल करुन पात्र अर्जदारांना केंद्रबिंदू मानून आपले ग्राहक मानून त्यांची कमी गैरसोय होईल, याची दक्षता घेत त्यांना नियत कालावधीमध्ये सेवा देण्यात यावी. पात्र नागरीकांना वारंवार सेवेसाठी शासकीय कार्यालयालयात येण्याची आवश्यकता गरज भासू देवू नये. त्यांच्या मोबाईलवर सर्व अधिसूचित मागणी सेवा पुरविण्यात याव्यात. सेवेसाठी पात्र नसतील तर तसे कोणत्या क्षेत्रात पात्र होतील त्याबद्दल समुपदेशन करणे हा सुध्दा त्यांच्या कर्तव्यपूर्तीचा भाग असल्याचे समजावून सांगीतले. 

विभाग प्रमुखांकडे प्रलंबीत असलेल्या सेवेचा आढावा घेऊन जिल्हयात चालू असलेल्या सेतू सुविधा / आपले सरकार सेवा केंद्राची पाहणी करुन जनतेला सेवा देण्यात येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. अधिसूचित केलेल्या सेवा वेळेत मिळवून देण्यासाठी अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. लोकसेवा अधिनियम 2015 नियम 2016 ची पुन:श्च सर्व अधिकाऱ्यांकडून उजळणी करुन घेण्यात आली. 

महसूल विभागात औरंगाबाद, सिल्लोड, वैजापूर, पैठण, कन्नड, अंबाजोगाई, बीड आदी ठिकाणी उपविभागीय , तहसील कार्यालयास भेटी देवून तपासणी करण्यात आली. उपमहासंचालक मुद्रांक, अधिक्षक भूमि अभिलेख तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, यांच्या बैठका घेवून नियतकालावधीमध्ये सेवा पुरविण्याबाबत कार्यवाही करण्याबाबत प्रबोधन केले. 

औरंगाबाद विभागातील ग्रामीण भागात 6 हजार 500 पेक्षा पद निर्देशित असलेला विभाग म्हणजे ग्रामविकास व पंचायतराज विभाग आहे. या विभागाकडे विशेष लक्ष देवून महाराष्ट्र राज्य लोकसेवा अधिनियम 2015 बाबत पंचायत ग्रामपातळीवरील पद निर्देशित अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले. मुख्य सचिव दर्जाचे आयुक्त यांनी जनतेला सेवा मिळवून देण्यासाठी कमतरता जाणवू नये म्हणून औरंगाबाद विभागातील खुलताबाद, फुलंब्री, औरंगाबाद, गंगापूर, वैजापूर, सिल्लोड, कन्नड, पैठण, बीड, बदनापूर, सोयगाव, अंबाजोगाई अशा एकूण 12 पंचायत समितीमध्ये 1 हजार 300 ग्रामसेवक तथा पदनिर्देशित अधिकारी यांचे प्रशिक्षण स्वत: पूर्ण केले. 

सर्व कर्मचारी-अधिकाऱ्यांनी आपले सरकार पोर्टल व आटीएस महाराष्ट्रा RTS MAHARASHTRA मोबाईल ॲप डाऊनलोड करून ॲप वापरण्याबाबत सविस्तर प्रशिक्षण दिले. प्रत्यक्ष संवाद साधुन जनतेला अधिसूचित सेवा पुरविण्यासाठी संवेदनशीलता वाढविली. लोक सेवा हक्क अधिनियम 2015 मधून लहान लहान तरतूदी समजावून आपली सेवा, आमचे कर्तव्य या ब्रिद वाक्या नुसार अधिसूचित सेवा पुरविणे हे कर्तव्य आहे याची जाणीव करुन दिली. पंचायत समिती स्तरावर प्रथम व द्वितीय अपील अधिकारी गटविकास अधिकारी यांच्याशी बैठकीत प्रत्यक्ष चर्चा करुन गेल्या सात वर्षापासून प्रलंबीत असलेले 3 हजार 652 पैकी 3 हजार 386 अपील निकाली काढून जनतेला सेवा देण्यात आल्या. मुख्य सचिव दर्जाचे असणारे राज्य सेवा हक्क आयोग औरंगाबाद विभागाचे आयुक्त डॉ. किरण जाधव (सेवानिवृत्त भा.पो.से) हे सर्व/ पद निर्देशित अधिकारी, प्रथम व व्दितीय अधिकारी, नियंत्रण अधिकारी यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडी-अडचणी जाणून घेतल्या, अशी माहिती राज्य सेवा हक्क आयोगाचे सचिव दा. अं. वानखेडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.   

00000






केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...