Tuesday, December 6, 2022

 मृदा चाचणीतून शेतीत होतोय सकारात्मक बदल

-  वरिष्ठ  शास्त्रज्ञ डॉदेविकांत देशमुख

§  जागतिक मृदा दिन साजरा

 

नांदेड (जिमाका) दि. 6 :-  शेतकऱ्यांनी रासायनिक खते व औषधे यांचा वापर कमी करून सेंद्रिय खतांचा कार्यक्षम वापर करावा. मृदा चाचणीतून शेतीत  सकारात्मक बदल होत असल्याचे प्रतिपादन कृषि  विज्ञान केंद्र पोखर्णीचे  वरिष्ठ  शास्त्रज्ञ डॉदेविकांत देशमुख यांनी केले.

 

दिनांक 5 डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिनाचे औचित्य साधून जिल्हा अधिक्षक  कृषी  अधिकारी व जिल्हा मृद  सर्वेक्षण  मृद चाचणी अधिकारी    कृषि  विज्ञान केंद्र पोखर्णी यांचे संयुक्त  विद्यमाने आत्मा कार्यालय नांदेड येथे मृदा दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होतेकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोरगाव तेलंग गावचे  शेतकरी चंद्रकांत  क्षीरसागर  तर  मार्गदर्शक महणून कृषि  विज्ञान केंद्र पोखर्णीचे  वरिष्ठ  शास्त्रज्ञ डॉदेविकांत देशमुख,  डॉमाणिक कल्याणकरडॉसंदीप  जायेभाये, डॉमहेश अंभोरेडॉगिरीश देशमुख  यांची उपस्थिती होती.

 

मृदेचे मानवाच्या जीवनातील अनन्य साधारण महत्त्व विशद करून सर्वांनी मृदा परीक्षण अहवालाप्रमाणे पिकांना खताच्या मात्रा द्याव्यात, असे श्री. देशमुख यांनी सांगितले. कृषि  पर्यवेक्षक मनोज दिकतवार यांनी  शेतकऱ्यांना मृदा दिनाचे महत्व सांगून मृदा दिन साजरा करण्याचा उद्देश स्पष्ट केला. डॉ. माणिक कल्याणकर यांनी शेतीतील मृदा नमुना कसा घ्यावाप्रयोग शाळेमध्ये कसा पाठवावा या बाबतची माहिती सांगितली. तसेच जमिनीमध्ये  जैविक  सूक्ष्म जीवाचा  अधिवास  वाढणे  ही काळजी  गरज  असून  जैविक  संघट्रायकोडार्मा आदी जैविक  संघाचा  वापर  करावा असेही सांगितले. डॉसंदीप  जायेभाये  यांनी जमिनीचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी एकात्मिक अन्न द्रव्य व्यवस्थापनमिश्र पीक पद्धतीआंतर पीक पद्धती  विषयी माहिती दिली.

 

डॉमहेश अंभोरे यांनी जनावरातील  लंपी  स्किन  या विषाणूजन्य आजाराविषयी  माहिती दिलीतंत्र अधिकारी के.. जाधव  यांनी शेतकऱ्यांना जमीनीला  जिवंत ठेवण्यासाठी  सेंद्रिय शेतीतील बिजामृतजीवामृतदशपर्णी अर्कनिंबोळी अर्कइत्यादी घटकांचा वापर करण्याबाबत मार्गदर्शन केले. समाजाची  शेती  जमिनीपासून नाळ तुटू नयेतसेच शेतकऱ्यांनी नियमितपणे आपल्या मातीची तपासणी करावी असेही आवाहन त्यांनी केले.  सेंद्रिय खत वापराचे फायदे, तणनाशकाचा कमी वापरमातीचे सशक्तीकरणनैसर्गिक शेतीझीरो बजेट शेतीगांडू खत निर्मिती, कृषिक अँप बद्दल माहिती यावेळी देण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते मौजे बोरगाव तेलंग गावातील उपस्थित शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिकीचे वाटप करण्यात आले.

 

कार्यक्रमाचे सूत्र संचालन कृषी सहायक  वसंत जारीकोटे  यांनी तर जिल्हा मृद सर्वेक्षण   मृद  चाचणी  अधिकारी  प्रकाश पल्लेवाड यांनी आभार मानलेया कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा मृद सर्वेक्षण  मृद चाचणी कार्यालयातील कृषी पर्यवेक्षक शिवाजी शिंदेकृषी सहायक  दत्तात्रय चिंतावारगजानन पडलवारजावेद शेखमोहन बेरजे, कराळेश्रीमती सोनवणे यांनी परिश्रम घेतले.

00000




No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...