Tuesday, December 6, 2022

 महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

 

§   समाज कल्याण कार्यालयात समता पर्वाचा समारोप

नांदेड (जिमाका) दि. 6 :-  महामानव भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त समाज कल्याण कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस सहाय्यक आयुक्त डॉ. तेजस माळवदकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

 

सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्या विद्यमाने 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2022 या कालावधीत समता पर्वानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समता पर्व कार्यक्रमा अंतर्गत समाज कल्याण कार्यालयाच्या अधिनस्त शासकीय वसतिगृह, अनु.जाती शासकीय निवासी शाळा व जवाहरलाल नेहरु समाज कार्य महाविद्यालय व संशोधन केंद्र, सिडको नविन नांदेड तसेच महात्मा फुले विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ , संत रोहीदास चर्मोद्योग विकास महामंडळ, अपंग विकास महामंडळ इतर मागासवर्गीय विकास महामंडळ या विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

समाज कल्याण अधिकारी बी.एस.दासरी यांनी संविधान प्रस्ताविकेचे सामुहिक वाचन केले. सहाय्यक लेखाधिकारी डी.वाय.पतंगे, कार्यालय अधिक्षक आर.व्ही. सुरकूटलावारसमाज कल्याण कार्यालयातील कर्मचारी तसेच समता दूत व प्रकल्प अधिकारी सुजाता पोहरे व  विविध महामंडळाचे कर्मचारी उपस्थित होते. राष्ट्रगीताने समता पर्व कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

 

कार्यक्रम यशस्वीतेसाठी समाज कल्याण निरीक्षक श्रीमती एम.पी.राठोड के.टी. मोरे, आर.डी.सुर्यवंशी, स.क.नि. खानसोळे पी.जी, कदम दत्ता हरीवरिष्ठ लिपीक रमेश नागुलवार व  गंभीर शेबेटवार, रविकुमार जाधव , लिपीक दवणे दिनेश रामचंद्र, विजय गायकवाड, के.पी. जेटलावार, कैलास राठोडसंगणक ऑपरेटर रामदास पेंडकर, तालुका समन्वयक विजय माळवदकरश्रीमती अंजली नरवाडेशशिकांत वाघमारे, भगवान घुगेमहेश इंगेवाड, प्रमोद गायकवाड आदीनी परिश्रम घेतले.

 

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर  यांना  महापरिनिर्वाण

दिनानिमित्त जिल्हा जात पडताळणी कार्यालयात अभिवादन

  

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक विषमतेने ग्रासलेल्या भारतीय समाजाला समतेचा मार्ग दाखवला. उपेक्षित व शोषित घटकांच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करणारे व त्यांच्या उद्धारासाठी आयुष्य वेचणारे प्रज्ञासूर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती येथे आज 6 डिसेंबर 2022 रोजी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले.  समितीचे अध्यक्ष प्रकाश खपले, समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव सतेंद्र आऊलवार यांच्या हस्ते कॅडल मार्च लावून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

 

शासन निर्णय दि. 25 नोव्हेंबर 2022 अन्वये 26 नोव्हेंबरसंविधान दिन ते  6 डिसेंबर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन या कालावधीत समता पर्व आयोजित करण्यात आला होता.              डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी कार्यालयात समता पर्वाचा आज समारोप करण्यात आला. यावेळी एम. एस. मुळे, एस. जे. रणभिरकर, व्ही. बी. आडे, बी. एम. शिरगिरे, संजय पाटील, शिवाजी देशमुख, वैजनाथ मुंडे, बाबू कांबळे, सोनू दरेगावकर, मनोज वाघमारे, ओमशिवा चिंचोलकर, शंकर होनवडकर, सुनील पतंगे, अनिकेत वाघमारे, मोशीन शेख, संजय मंत्रे लहानकार यांची उपस्थिती होती.

0000

 



No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...