Saturday, March 3, 2018



रोजगार मेळाव्याचे बुधवारी आयोजन
नांदेड, दि. 3 :-  बेरोजगार उमेदवारांसठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांचेवतीने बुधवार 7 मार्च 2018 रोजी सकाळी 11 वा. रोजगार मेळाव्याचे आयोजन महात्मा फुले मंगल कार्यालय फुल मार्केट आयटीआय जवळ नांदेड येथे करण्यात आले आहे.
या रोजगार मेळाव्यास दोन नामाकिंत कंपनीचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. हेल्पर, सुरक्षा गार्ड, आयटीआय ट्रेनी, ॲडव्हायझर या पदाची संख्या जवळपास 180 असून किमान शैक्षणिक पात्रता एसएससी पास वेतन 8 ते 12 हजार रुपये, वयोमर्यादा 18 ते 35 वर्षे आहे.
इच्छूक उमेदवारांनी रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी www.mahaswayam.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन इन्ट्री पास असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्र. 02462-251674 वर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक संचालक, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांनी केले आहे.
00000

Thursday, March 1, 2018


सैन्य दलात अधिकारी पदाची संधी
नांदेड दि. 1 :-  भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी होण्यासाठी पात्र उमेदवारांना एसएसबी प्रशिक्षण वर्ग ठेवण्यात आला आहे. या प्रशिक्षण वर्गासाठी सैन्य दलातील तज्ज्ञ अधिकारी यांचेकडून प्रशिक्षण मिळणार आहे. कंम्बाईड डिफेन्स सर्व्हीसेस या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या स्पेशल एंट्रीद्वारे सैन्य दलात अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या तसेच महाराष्ट्रातील तरुण-तरुणींना सशस्त्र सैन्य दलाकडून एसएसबी परिक्षेची मुलाखत पत्रे मिळण्याची शाश्वती आहे अशा उमेदवारांना सर्व्हीसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीच्या पूर्व तयारीसाठी महाराष्ट्र शासनामार्फत छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र विभागीय आयुक्त कार्यालय परिसर नाशिकरोड नाशिक येथे प्रशिक्षण वर्ग चालविण्यात येणार आहे. प्रशिक्षण कोर्सचा कालावधी 13 ते 22 मार्च 2018 एकुण दहा दिवस असा आहे. प्रशिक्षण कालावधीत निवासाची, प्रशिक्षणाची व भोजनाची सोय विनामुल्य करण्यात आली आहे.
इच्छूक व पात्र उमेदवारांनी प्रशिक्षण वर्गात प्रवेश घेण्यासाठी 12 मार्च 2018 रोजी सकाळी 10.30 वा. छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र, विभागीय आयुक्त कार्यालय परिसर, नाशिक रोड, नाशिक येथे पात्र उमेदवारांनी शैक्षणिक प्रमाणपत्र व गुणपत्रिकेच्या मुळ प्रतीसह मुलाखतीस उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्र. 0253-2451031 व 2451032 वर कार्यालयीन वेळेत सकाळी 10 ते सायं. 5.30 वाजेपर्यंत संपर्क साधावा.
एसएसबी प्रवेश वर्गासाठी पुढील प्रमाणे कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे. यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येताना घेऊन येणे आवश्यक आहे. कंम्बाईड डिफेन्स सर्व्हीसेस एक्झामिनेशन (युपीएससी) अथवा नॅशनल डिफेंस ॲकेडमी एक्झामिनेशन (युपीएससी) उत्तीर्ण असावी. त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एनसीसी (सी) प्रमाणपत्र अे / बी ग्रेड मध्ये उत्तीर्ण झालेले असावे. एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीसाठी शिफारस केली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. युनिव्हर्सिटी एन्ट्री स्किमसाठी एसएसबी कॉल लेटर आलेले असावे अथवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे. या प्रशिक्षण वर्गाचा जास्तीतजास्त पात्र तरुण-तरुणींनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभारी अधिकारी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड नाशिक यांनी केले आहे.
000000


भारतरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अर्ज करण्यास मुदतवाढ ;
शिक्षण घेत असलेल्या जिल्ह्यात अर्ज करता येणार
            नांदेड दि. 1 :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतर्गत सन 2017-18 या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज मागविण्यात आले होते. परंतू आयुक्त समाजकल्याण आयुक्तालय पुणे यांच्या निर्देशान्वये या योजनेच्या कार्यपध्दतीत पुढील प्रमाणे बदल करण्यात आला आहे.
या योजनेंतर्गत सन 2017-18 साठी विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याची मुदत दिनांक 15 मार्च 2018 पर्यत वाठविण्यात आली आहे. पुर्वी दिलेल्या सुचनेनुसार विद्यार्थ्याने त्यांच्या रहिवाशी जिल्हयात (विद्यार्थी जिल्हा) या योजनेसाठी अर्ज करावयाचा होता. त्यात बदल करण्यात आला असुन विद्यार्थी ज्या जिल्ह्यात शिक्षण घेत आहे. (कॉलेज जिल्हा) त्या जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त यांचेकडे अर्ज करता येतील. हा बदल 31 डिसेंबर 2017 पुर्वी प्राप्त झालेल्या अर्जांसाठी लागू राहणार नाही. सन 2017-18 या शैक्षणिक वर्षासाठी यापुर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी अर्ज करु नये, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे.
000000


   स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे दोन दिवस आयोजन ;
ताणतणाव, अर्थसंकल्प, पर्यावरण विषयांवर मार्गदर्शन  
नांदेड, दि. 1 :- उज्ज्वल नांदेड मोहिमेअतंर्गत जिल्हाधिकारी कार्यालय, सेतू समिती, नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने सोमवार 5 मार्च व 6 मार्च 18 रोजी डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, स्टेडियम परिसर नांदेड येथे दोन दिवसीय स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन ‍शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार 5 मार्च रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न    होणा-या  या शिबिरात डॅा. नंदकुमार मुलमुले हे ताणतणावाचे व्यवस्थापन या विषयावर तर पुणे येथील प्रा. अभिजित राठोड हे राजकोषीय धोरण, वित्तीय तुट व अर्थसंकल्प 2018  या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
मंगळवार 6 मार्च रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 यावेळेत पुणे येथील डॉ. तुषार घोरपडे हे पर्यावरण परिस्थिती या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या मार्गदर्शन ‍शिबिरास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी केले आहे.
000000

Wednesday, February 28, 2018


   विवाहसाठी ऑनलाईन नोटीस देता येणार;  
त्यासाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही  
नांदेड, दि. 28 :- विशेष विवाह कायदान्वये विवाहसाठी द्यावयाची नोटीस ऑनलाईन देता येणार आहे. त्यासाठी विवाह अधिकारी कार्यालयात समक्ष जाण्याची गरज नाही. दस्त नोंदणी प्रमाणे विशेष विवाह नोंदणी प्रणालीचे संगणकीकरण करण्यात आले आहे. विवाह अधिकारी कार्यालयात आल्यानंतर डेटा एन्ट्री करण्यात पक्षकारांचा वेळ जाऊ नये  व त्यामध्ये चुका होऊ नाहीत यासाठी पब्लिक डेटा एन्ट्रीची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. ही सुविधा विभागाच्या igrmaharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत, अशी माहिती मुद्रांक जिल्हाधिकारी एस. के. बोधगीरे यांनी दिली आहे.  
राज्यातील सर्व विवाह अधिकाऱ्यांची कार्यालये मध्यवर्ती सर्व्हरवर जोडण्यात आली असून कार्यालयात विशेष विवाह नोंदणीसाठी संगणकीकृत आज्ञावलीचा वापर होत आहे. विशेष विवाह कायदा 1954 हा केंद्रीय कायदा आहे. यानुसार विवाह अधिकाऱ्यासमोर विवाह संपन्न करण्याची तरतूद आहे. तसेच अलाहिदा झालेल्या विवाहची नोंदणी करण्याची देखील तरतुद आहे.
विवाह संपन्न करण्याविषयी
या कायद्यानुसार विवाह संपन्न करण्यासाठी विवाह इच्छूक वर-वधू यांनी आपल्या नियोजित विवाहची नोटीस संबंधीत जिल्ह्याचे विवाह अधिकारी यांना द्यावी लागते. तसेच वय व रहिवासीचे कागदपत्र पुरावे द्यावे लागतात आणि नोटीस शुल्क भरावी लागते. वर-वधू विहित अटींची पूर्तता करीत असल्यास विवाह अधिकारी  नोटीस स्वीकारतात व त्याची प्रत नोटीस बोर्डवर लावतात. तसेच दोघांपैकी एक पक्ष अन्य जिल्ह्यातील असल्यास त्या जिल्ह्याचे विवाह अधिकारी यांच्याकडे नोटीस बोर्डावर लावण्यासाठी पाठवितात.
विवाह अधिकारी यांच्याकडे नोटीस दिल्यानंतर तीस दिवसाच्या आत नियोजित विवाहाबद्दल आक्षेप न आल्यास , त्यानंतरच्या साठ दिवसात वर-वधू तीन साक्षीदारांसमक्ष विवाह अधिकाऱ्यांसमोर हजर राहतात व विवाह अधिकारी त्यांचा विवाह संपन्न करुन विवाह प्रमाणपत्र देतात.
प्रत्येक जिल्ह्याचे मुख्यालयातील एक दुय्यम निबंधक यांना त्या जिल्ह्यासाठी विवाह अधिकारी घोषित करण्यात आलेले आहे. मुंबई, मुंबई उपनगर व पुणे या जिल्ह्यासाठी स्वतंत्र विवाह अधिकारी आहेत. राज्यात दरवर्षी सुमारे 30 हजार विवाह या पध्दतीने संपन्न होतात.
झालेल्या विवाहांची नोंदणी
अलाहिदा विवाह झालेल्या जोडप्यांनी जर विवाहची नोंदणी केलेली नसेल, तर त्यांना विवाह नोंदणी करुन घेण्याची देखील सुविधा या कायद्यामध्ये आहे. त्यासाठी सदर पती-पत्नी यांना विवाह अधिकारी कार्यालयास अर्ज द्यावा लागतो. या अर्जानंतर 30 दिवसानंतर त्यांना विवाह नोंदणीसाठी विवाह अधिकाऱ्यांसमोर उपस्थित रहावे लागते.
ऑनलाईन नोटीस
विशेष विवाह नोंदणीमध्ये वर-वधुंना विवाह अधिकाऱ्यांकडे नोटीस देणे व तीस दिवसानंतर विवाह संपन्न करणे अशा दोन कामासाठी जावे लागते. यापैकी नोटीस देण्याची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पूर्ण करता येईल अशी व्यवस्था दिनांक 1 नोव्हेंबर 2017 पासून कार्यान्वित करण्यात आली आहे. याचरितीने झालेल्या विवाहाची नोंदणी करण्यासाठीचा अर्ज ऑनलाईन देता येईल, अशीही व्यवस्था कार्यान्वित करण्यात येत आहे.
प्रणाली वापरकर्ते व उपब्धता
या प्रणालीमध्ये संबंधित विवाह इच्छूक पक्षकार व विवाह अधिकारी असे दोन वापरकर्ते असणार आहेत. पक्षकारांसाठी ही प्रणाली विभागाच्या igrmaharashtra.gov.in   या संकेतस्थळावर ऑनलाईन सर्व्हिस मॅरेज रजिस्ट्रेशन सर्व्हिस ऑनलाईन मॅरेज नोटीस येथे उपलब्ध आहे. विवाह अधिकारी यांना ही प्रणाली विभागासाठीच्या एमपीएलएस-व्हीपीएन नेटवर्कमध्ये उपब्ध असणार आहे.
ऑनलाईन नोटीस बोर्ड
सद्या विवाह अधिकाऱ्यांना विवाहाची नोटीसची प्रत नोटीस बोर्डवर लावावी लागते. तसेच दोघांपैकी एक पक्ष अन्य जिल्ह्यातील असल्यास त्या जिल्ह्याचे विवाह अधिकारी यांच्याकडे नोटीस बोर्डवर लावण्यासाठी पाठवावी लागते. हा नोटीस बोर्ड नागरिकांना पाहण्यासाठी खुला असतो. नवीन प्रणालीमध्ये हा नोटीस बोर्ड विभागाच्या igrmaharashtra.gov.in   या संकेतस्थळावर ऑनलाईन सर्व्हिस मॅरेज रजिस्ट्रेशन सर्व्हिस मॅरेज नोटीस बोर्डे येथे उपलब्ध आहे. नागरिकांना राज्यातील कोणत्याही विवाह अधिकारी कार्यालयात दिलेल्या विवाहाचा तपशिल येथे पाहता येईल.
वापरासाठी आवश्यक बाबी
विवाह इच्छूक वर-वधूकडे आधार क्रमांक आवश्यक आणि आधार प्रणालीबरोबर ओळख पडताळणी करण्यासाठी सहमती देण्याची तयारी आवश्यक आहे. इंटरनेट सुविधा, वेबकॅम, बायोमॅट्रीक डिवाईस व नेटबँकिग सुविधा असलेले बँक खाते ( या सुविधा स्वत:कडे उपलब्ध नसल्यास महा-ई सेवा केंद्र किंवा ई-रजिस्ट्रेशन सेवा देणाऱ्या व्यक्ती, संस्थांची मदत घेता येईल.)
प्रणालीची महत्वाची वैशिष्ट्ये
 नोटीस देण्यासाठी विवाह अधिकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. वेळेचे बंधन नाही. कोणत्याही वेळी कोणत्याही सोयीच्या ठिकाणाहून प्रक्रिया करता येईल. प्रत्येक टप्प्यावर एसएमएस येणार. नोटीस बोर्ड संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे. नोटीस शुल्क ऑनलाईन भरता येणार आहे.
प्रणालीचे महत्वाचे फायदे
पक्षकाराच्या वेळ व पैशाची बचत. गतीमान-पारदर्शी व विनामध्यस्थ सेवा. विवाह अधिकारी कार्यालयात वर्दळ कमी. प्रत्यक्ष विवाह संपन्न करण्यासाठी अधिक निवांत व प्रसन्न वातावरण. या सर्व फायद्यामुळे विशेष विवाह पध्दतीने विवाह करण्यास प्रोत्साहन मिळून सामाजिक हित साधले जाणार, अशी माहिती सह-जिल्हा निबंधक वर्ग 1 व मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय व्हीआयपी रोड नांदेड यांनी दिली आहे.
       00000


महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे
अध्यक्ष न्या. गायकवाड यांचा दौरा
नांदेड, दि. 28 :- मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक मागासलेपण व शासकीय नोकऱ्यामध्ये असलेले प्रमाण याविषयी शासनास अहवाल सादर करण्याच्या दृष्टिने महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड हे मराठा समाजास आरक्षण देण्यासंदर्भातील सुनावणीसाठी व इतर अनुषंगीक कामकाजासाठी 1 मार्च ते 6 मार्च 2018 या कालावधीत नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर राहणार आहेत. त्यांचे 1 मार्च रोजी सकाळी 8 वा. देवगिरी एक्सप्रेसने नांदेड येथे आगमन होणार आहे.
00000


अपंगत्व माजी सैनिकांना
माहिती देण्याचे आवाहन 
       नांदेड, दि. 28 :- राष्ट्रसेवा करताना अपंगत्व आलेल्या सैनिकांचा सन्मान करण्यासाठी भारतीय  लष्कराने 2018 हे वर्ष अपंग वर्ष  घोषीत केले आहे.  अपंग झालेल्या सैनिकांचा सन्मानाप्रित्यर्थ  मुख्यालय, सदन  कमाण्ड, पुणे यांनी महाराष्ट्रातील अपंग माजी सैनिकांची माहिती मागितली आहे. जिल्हयातील माजी सैनिक युद्वजन्य परिस्थिती व्यतिरिक्त अपंग झाले असतील तर त्यांनी  जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात  विहीत नमुन्यातील फॉर्म  भरुन दयावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने यांनी केले आहे.
00000



केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...