Sunday, November 15, 2026

केंद्र व राज्य शासनाच्या विविध कृषी तसेच अन्य शासकीय योजनांचा लाभ थेट मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक प्रणालीमध्ये आपली माहिती अद्ययावत करून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी आणि फार्मर आयडी तयार करून घ्यावा, असे आवाहन मदत व पुनर्वसन विभागाने केले आहे.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची रक्कम थेट बँक खात्यात जमा होण्यासाठी आवश्यक नोंदणी व पडताळणी पूर्ण असणे महत्त्वाचे आहे. फार्मर आयडी तयार करण्यासाठी शेतकऱ्यांनी जवळच्या सीएससी (नागरी सुविधा केंद्रात) आधार कार्ड व आधारशी संलग्न मोबाईल क्रमांकासह संपर्क साधावा.
ई-केवायसी किंवा फार्मर आयडी तयार करताना तांत्रिक अथवा अन्य अडचणी आल्यास त्या सोडविण्यासाठी राज्य शासन आवश्यक सहकार्य करणार असून, शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन विभागाने केले आहे.

No comments:

Post a Comment

महात्मा जोतीराव फुले : सामाजिक क्रांतीचा अखंड वारसा ! महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या ऐतिहासिक कार्याला ...