वृत्त क्रमांक
महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
नांदेड (जिमाका), दि. 02 : जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे,तहसीलदार शंकर लाड, रावसाहेब पोहरे, गजानंद ऐनवाड, गणेश नरहिरे, भास्कर गुंगे, बालासाहेब भराडे, गजानन पोतदार, आशिष सातारे,डॉ स्वाती अलोने, मिरा इंदुरकर,मनिषा पानपट्टे, ज्योती कदम, अनिता काळे, सखू शहाणे, रेखा राठोड , माधुरी ठाकुर यांच्या सह अधिकारी कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
***

No comments:
Post a Comment