Friday, October 2, 2026

वृत्त क्रमांक

'माहिती अधिकार दिन' उत्साहात साजरा 

नांदेड दि. 2 ऑक्टोबर :- माहितीचा अधिकार अधिनियम २००५ या कायद्याच्या व्यापक प्रसिध्दीसाठी व प्रभावी अंमलबजावणीकरीता २८ सप्टेंबर हा दिवस राज्यस्तरावर दरवर्षी 'माहिती अधिकार दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानुसार नुकताच सोमवार २८ सप्टेंबर २०२६ रोजी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णूपुरी नांदेड या कार्यालयात 'माहिती अधिकार दिन' चे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख हे होते. कार्यक्रमाची सुरुवात व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या स्वागताने करण्यात आली. अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांचे स्वागत डॉ. मुकूंद कुलकर्णी, प्रथम अपिलीय अधिकारी, माहिती अधिकार तथा सहयोगी प्राध्यापक, शरीरक्रियाशास्त्र विभाग यांनी केले. डॉ. हेमंत गोडबोले, उपअधिष्ठाता तथा विशेष कार्य अधिकारी यांचे स्वागत संजय वाकडे, जन माहिती अधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी महाविद्यालय विभाग यांनी केले, उपअधिष्ठाता तथा प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. शितल राठोड, औषधवैद्यकशास्त्र विभाग यांचे स्वागत भिमराव परोडवाड, सहायक जन माहिती अधिकारी तथा कार्यालयीन अधीक्षक रुग्णालय विभाग यांनी केले, डॉ. अजय वराडे उपवैद्यकीय अधीक्षक तथा सहयोगी प्राध्यापक, जीवरसायनशास्त्र विभाग यांचे स्वागत श्री. मारोती बुरफुले, सहायक जन माहिती अधिकारी तथा कार्यालयीन अधीक्षक, महाविद्यालय विभाग यांनी केले. डॉ. मुकुंद कुलकर्णी, प्रथम अपिलीय अधिकारी, माहिती अधिकार तथा सहयोगी प्राध्यापक, शरीरक्रियाशास्त्र विभाग व डॉ. अनिल देगांवकर, प्राध्यापक व विभागप्रमुख, शल्यचिकीत्साशास्त्र विभाग यांचे स्वागत किशोर भांगे, लघुलेखक, माहिती अधिकार कार्यासन यांनी केले तर संजय वाकडे, जन माहिती अधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी यांचे स्वागत प्रशांत पाठक, वरीष्ठ सहायक यांनी केले.

सदर कार्यक्रमास डॉ. कांतीलाल चंडालिया, डॉ. वैशाली इनामदार, डॉ. किशोर राठोड, डॉ. मोहम्मद समीर, डॉ. वंदना दुधमल, डॉ. कपिल मोरे, डॉ. पंकज कदम, डॉ. उध्दव माने, डॉ. शिवानंद देवसरकर, सतिश इंगळे, बालाजी बोधगिरे, मारोती बुरफुले, भिमराव परोडवाड, प्रशांत पाठक आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे मुख्य वक्ते डॉ. मुकुंद कुलकर्णी, प्रथम अपिलीय अधिकारी, माहिती अधिकार तथा सहयोगी प्राध्यापक, शरीरक्रियाशास्त्र विभाग यांनी “ माहितीचा अधिकार अधिनियम २००५” या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले. त्यांनी या कायद्यातील विविध कलमे, प्रकरणे इ. विस्तृतपणे विशद करुन अगदी सोप्या भाषेत या कायद्याविषयी माहिती सांगितली. माहितीचा अर्ज कसा करावा, तद्नंतर प्रथम व द्वितीय अपिल कसे व किती कालावधीत कोणाकडे करावे, अर्ज शुल्क, माहितीचे शुल्क कसे व कोणाकडे भरणा करावे, माहिती किती दिवसात द्यावी, माहिती किती प्रकारची असते, त्रयस्थ पक्ष म्हणजे काय इ. बाबींचा त्यांनी उहापोह केला. तसेच त्यांनी नमुद केले की, सदर कायदा हा नागरीकांना प्रशासनाच्या कामकाजाबाबत माहिती मिळवून देणारा महत्त्वपूर्ण कायदेशीर अधिकार प्रदान करतो. प्रशासनात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि लोकसहभाग वाढविण्यासाठी माहिती अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक असल्याचेही त्यांनी नमुद केले.

सदर कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी नमुद केले की कोणत्याही सर्वसामान्य माणसाला शासकीय कामकाजात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करुन देणारा हा कायदा आहे. या देशाचा कोणताही नागरीक या कायद्याचा आधार घेवून त्याला हवी असलेल्या माहितीची प्रशासनाकडे मागणी करु शकतो व ती प्राप्त करुन घेवून त्याचे पुढील कार्य पूर्ण करुन घेवू शकतो. तसेच ते पुढे बोलतांना म्हणाले की, या कायद्यामुळे नागरीकांचा प्रशासनातील कामकाजात सहभाग वाढलेला आहे, प्रशासन अधिक उत्तरदायी व पारदर्शक होण्यास मदत झाली आहे. या कायद्यामुळे लोकशाहीचा पाया अधिकच बळकट झाला आहे.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक किशोर भांगे लघुलेखक यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. मुकूंद कुलकर्णी यांनी केले. या कार्यक्रमास या कार्यालयातील इतर अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नारायण चोले, रवी वडजे, अतुल इंगोले यादींनी परिश्रम घेतले.

00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक येरगी ग्रामसभेत व रिफॉर्म उत्सवात केंद्रीय सहसचिव पी. नरहरी यांचा सहभाग ग्रामस्थांशी संवाद साधत शाश्वत ग्रामविकासासाठी केले मा...