Monday, June 22, 2026

वृत्त क्रमांक 

जिल्हा व सत्र न्यायालयात योग दिवस उत्साहात साजरा 

नांदेड दि. 22 जून :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या सुचनेनुसार प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष नरेंद्र ब्रह्ये यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव शरद देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त 20 जून रोजी सकाळी 7 वा. जिल्हा व सत्र न्यायालय नांदेड येथे योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नरेंद्र ब्रह्ये यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच न्याायालयातील बहुतांश न्यायाधीश, अधिकारी, विधिज्ञ, कर्मचारी तसेच उपस्थित मान्यवरांनी उत्साहाने सहभाग घेतला.

कार्यक्रमात योग प्रशिक्षक म्हणुन शिवा बारकुल आणि श्रीमती मिना कुमारी बैतुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने व प्राणायामाचे मास्टर ओंकार व अर्जुन डांगे यांनी प्रात्याक्षिके करून दाखवली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नरेंद्र  ब्रह्ये  यांनी योगामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते. दैनंदिन जीवनात तणावमुक्त राहण्यासाठी योगाचे महत्व सांगून योगासना मधील विविधी आसना बद्दल मोलांचे मार्गदर्शन केले.

कार्यक्रम शांतता व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. उपस्थित सर्वांनी नियमितपणे योगाभ्यास करण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. आभार प्रदर्शन शरद देशपांडे सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी केले. सदर कार्यक्रमात एकुण 176 जणांची उपस्थिती होती.

0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक   मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) अंतर्गत गणना फॉर्म संकलन व डिजिटायझेशनसाठी विशेष कॅम्प मतदार यादी अधिक अचूक, अद्ययाव...