वृत्त क्रमांक
प्रकल्प ‘AI-सारथी’चा शुभारंभ :
जिल्हा परिषद शिक्षकांच्या डिजिटल सक्षमीकरणासाठी एसआरटीएमयूचा अभिनव उपक्रम
नांदेड, दि. ५ जून २०२६: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या गणितशास्त्र संकुल (School of Mathematical Sciences) आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच जिल्हा परिषद, नांदेड यांच्या सहकार्याने आयोजित *“प्रोजेक्ट AI-सारथी : Capacity Building in Digital Pedagogy and Experiential Learning for ZP Educators”या दोन दिवसीय कार्यकारी विकास कार्यक्रमाचा (Executive Development Program) आज एमओओसीज प्रशिक्षण केंद्र, एसआरटीएमयू येथे उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ झाला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि जिल्हा परिषद, नांदेड यांच्यात शैक्षणिक सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.
कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभास प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, शिक्षणाधिकारी सौ. वंदना फुटाणे, कुलसचिव डॉ. डी. डी. पवार, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील तसेच इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड लिंकेजेस (IIL) संचालक डॉ. शैलेश वाधेर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी कार्यक्रमाचे संयोजक *डॉ. सुरेंद्रनाथ रेड्डी, गणितशास्त्र संकुलाच्या संचालिका व कार्यक्रमाच्या सचिव **प्रा. (डॉ.) रुपाली जैन, सीआयसी संचालक **डॉ. कृष्णचैतन्यतसेच जनसंपर्क अधिकारी *डॉ. अशोक कदमहेही उपस्थित होते.
प्रास्ताविकात IQAC चे संचालक डॉ. बी. सुरेंद्रनाथ रेड्डी यांनी प्रकल्प AI-सारथीची संकल्पना, उद्दिष्टे आणि प्रशिक्षण कार्यक्रमाची रूपरेषा मांडली.
प्रमुख पाहुण्या मा. मेघना कावली, आयएएस यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात शिक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या वाढत्या भूमिकेवर प्रकाश टाकला. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल साधनांच्या प्रभावी वापराद्वारे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, चिकित्सक विचार आणि स्व-अध्ययनाची क्षमता विकसित करण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. जिल्ह्यातील आदीवासी भागातील वाडी तांड्यावर तंत्रज्ञानाची ज्ञानगंगा वाहीली पाहीजे असे या प्रशिक्षणातून अपेक्षा व्यक्त केली. उपस्थित प्रशिक्षणार्थी शिक्षकानी या प्रशिक्षणातून प्रेरीत होऊन आपल्या शाळेत AI या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुणवत्ता वाढवावी असे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी मा. वंदना फुटाणे यांनी प्रशिक्षणात दिल्या जाणार्या AI कंटेंट ची माहीती घेऊन प्रशिक्षण घटक आणि इतर बाबींची माहीती घेऊन जिल्ह्यातील शिक्षकाकडून AI च्या माध्यमातून वर्ष 2026-27 हे AI तंत्रज्ञान च्या वापराने समृध्द होईल आणि जिल्हा परिषद शाळांच्या गुणावत्ता विकासासाठी सदर प्रशिक्षणाची मदत् हॊईल ही अपेक्षा व्यक्त केली.
अध्यक्षीय समारोपात कुलगुरू मा. डॉ. मनोहर चास्कर यांनी शिक्षणातील डिजिटल परिवर्तन ही काळाची गरज असल्याचे नमूद केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या शिक्षण संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षकांचे सातत्यपूर्ण कौशल्यवर्धन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल अध्यापन साधने, आभासी प्रयोगशाळा, गणितीय सॉफ्टवेअर, वेब-आधारित शैक्षणिक संसाधने आणि अनुभवाधारित अध्यापन पद्धतींचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे. या उपक्रमात जिल्हा परिषद शाळांतील मोठ्या संख्येने स्वंयस्फुर्तीने शिक्षक सहभागी झाले आहेत.
हा उपक्रम शालेय शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल अध्यापन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर वाढविण्यासाठी तसेच शिक्षकांना भविष्योन्मुख शैक्षणिक कौशल्यांनी सुसज्ज करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असेल, अश्या भावना प्रशिक्षणार्थ्यानी व्यक्त केल्या.
000000
.jpeg)
.jpeg)
...jpeg)
No comments:
Post a Comment