पहिल्या
पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत
—
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
नांदेड,
दि. १० फेब्रुवारी :- जिल्ह्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेतील पहिला इंग्रजी विषयाचा
पेपर आज ११२ परीक्षा केंद्रावर झाला.या परीक्षा केंद्रांवर बैठे पथकांमार्फत झूम वेबकास्टद्वारे
संपूर्ण वेळ परीक्षेचे नियंत्रण ठेवण्यात आल्याने पहिला पेपर सुरळीत पार पडला अशी माहिती
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली.
पोलीस
यंत्रणेमार्फत चोख बंदोबस्त ठेवण्यात आल्याने कोणत्याही परीक्षा केंद्रावर बाहेरून
जमाव दिसून आला नाही. शासनाच्या निर्देशानुसार यावर्षीची परीक्षा कॉपीमुक्त व भयमुक्त
वातावरणात पार पाडण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या असून, त्याचाच एक भाग म्हणून
बारावीच्या पहिल्या इंग्रजी विषयाच्या पेपरसाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर झूम वेबकास्टद्वारे
थेट निरीक्षण करण्यात आले.
या
निरीक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात जिल्हास्तरीय
नियंत्रण कक्ष (वॉर रूम) कार्यान्वित करण्यात आला होता. या प्रभावी व्यवस्थेमुळे जिल्ह्यातील
सर्व परीक्षा केंद्रांवरील परीक्षा शांततापूर्ण व पारदर्शक वातावरणात पार पडली.
दरम्यान,
सीसीटीव्ही निरीक्षणादरम्यान एका परीक्षा केंद्रावर परीक्षार्थी गैरप्रकार करताना आढळून
आला. त्यामुळे नेताजी सुभाषचंद्र बोस उच्च माध्यमिक विद्यालय, पानभोसी (ता. कंधार)
येथील एका परीक्षार्थ्याविरुद्ध गैरप्रकाराची नोंद करण्यात आली. उर्वरित सर्व केंद्रांवर
परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
जिल्हा नियंत्रण कक्षाची संकल्पना जिल्हाधिकारी राहुल
कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मेघना कावली व पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार
यांच्या मार्गदर्शनाखाली साकारण्यात आली आहे.
स्वतः
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी महात्मा फुले आश्रमशाळा, वाघाळा येथील परीक्षा केंद्राला
भेट दिली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांची रांग योग्य पद्धतीने न लावल्याचे निदर्शनास
आल्याने संबंधित केंद्रसंचालक व पर्यवेक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश
देण्यात आले. याच केंद्रास मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मेघना कावली यांनीही भेट
दिली.
तसेच
शिक्षणाधिकारी माधव सलगर यांनी श्री. भीमाशंकर उच्च माध्यमिक विद्यालय, शिराढोण व नेताजी
सुभाषचंद्र बोस उच्च माध्यमिक विद्यालय, पानभोसी या केंद्रांना भेटी दिल्या. शिक्षणाधिकारी
दिलीपकुमार बनसोडे यांनी विद्याविकास उच्च माध्यमिक विद्यालय, बा-हाळी व आश्रमशाळा,
चव्हाणवाडी या केंद्रांची पाहणी केली.
रामचंद्र
पाचंगे यांनी राष्ट्रमाता उच्च माध्यमिक विद्यालय, वाजेगाव येथील केंद्रास, तर अवधूत
गंजेवार यांनी आश्रमशाळा, मरवाळी तांडा येथील केंद्रास भेट दिली.
डायटचे
प्राचार्य अमोल निळेकर यांनी लाल बहादूर शास्त्री उच्च माध्यमिक विद्यालय, संगुचीवाडी
येथे, तर ज्येष्ठ अधिव्याख्याता श्रीमती मंजूषा औंढेकर यांनी जिल्हा परिषद हायस्कूल
व दि ओअॅसिस स्कूल, कुंटूर येथील परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या.
परीक्षेवर
लक्ष ठेवण्यासाठी जिल्ह्यात महसूल विभागाचे ८, जिल्हा परिषदेचे १२ व शिक्षण विभागाचे
६ पथके कार्यरत होती. याशिवाय उपविभाग स्तरावर ८ उपविभागीय अधिकारी, तालुका स्तरावर
१६ तहसीलदार, १६ गटविकास अधिकारी, १६ नायब तहसीलदार व १६ कृषी विकास अधिकारी यांची
भरारी पथके सक्रिय होती. अशा प्रकारे जिल्ह्यात एकूण १०१ भरारी पथकांनी परीक्षेच्या
पहिल्या दिवशी प्रभावी कामकाज केले.
जिल्हाधिकारी
कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, जिल्हा विज्ञान व सूचना अधिकारी प्रदीप
दुमणे व जिल्हा परिषदेत सुनील आलूरकर,श्री. पोकले व इतर अधिकारी लक्ष ठेऊन होते.
आजच्या
इंग्रजी विषयाच्या पहिल्या पेपरसाठी एकूण ४२ हजार ८०३ परीक्षार्थ्यांपैकी ४१ हजार ७२३
परीक्षार्थी उपस्थित होते. यामध्ये उपस्थितीचे प्रमाण ९७.४८ टक्के असल्याची माहिती
प्रशासनाकडून देण्यात आली.
०००००
No comments:
Post a Comment