सुरक्षित इंटरनेट दिन
साजरा
नांदेड, दि.१० फेब्रुवारी:-
Safer Internet Day हा दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात जगभर साजरा केला जातो. यावर्षी
“Smart Tech, Safe Choices – Exploring the Safe
and Responsible Use of Artificial Intelligence (AI)” या संकल्पनेखाली आज १० फेब्रुवारी रोजी सुरक्षित इंटरनेट दिन शासकीय
पॉलिटेकनिक कॉलेज, नांदेड येथे साजरा करण्यात आला.
सकाळी १० वाजता ऑनलाइन
सुरक्षिततेबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात आली. सुरक्षित इंटरनेट दिनाच्या निमित्ताने
सायबर गुन्हे, कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून होणाऱ्या ऑनलाइन फसवणुका, इंटरनेट
वापरातील सुरक्षितता तसेच सोशल मीडियाचा योग्य वापर याबाबत जनजागृती करण्यासाठी विविध
कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या मोहिमेत विद्यार्थी
व शिक्षकांनी सक्रिय सहभाग घेतला. इंटरनेटचा सुरक्षित वापर कसा करावा, सोशल मीडिया
वापरताना कोणती खबरदारी घ्यावी, ओटीपी व पासवर्ड सुरक्षित ठेवण्याचे महत्त्व तसेच बँकिंग
व्यवहार करताना घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
व्याख्यानादरम्यान सायबर
गुन्हे, फिशिंग हल्ले, ऑनलाइन फसवणूक, सुरक्षित पासवर्ड व्यवस्थापन तसेच डिजिटल स्वच्छता
(Digital Hygiene) या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मोठ्या
संख्येने सहभाग घेत विविध प्रश्न विचारले व सायबर सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण माहिती
मिळवली.
ऑनलाइन गुन्हेगारी रोखण्यासाठी
व नागरिकांना सायबर सुरक्षिततेबाबत सजग करण्याच्या उद्देशाने ही जनजागृती मोहीम राबविण्यात
आली.
हा कार्यक्रम १० फेब्रुवारी
रोजी शासकीय पॉलिटेक्निक कॉलेज, नांदेड येथील माहिती तंत्रज्ञान (IT) विभागात आयोजित
करण्यात आला होता.
कार्यक्रमासाठी संबंधित
विभागाचे विभागप्रमुख (HOD), प्राचार्य व इतर प्राध्यापक उपस्थित होते. तसेच जिल्हा
सूचना व विज्ञान अधिकारी प्रदीप दुमणे यांनी मार्गदर्शनपर व्याख्यान दिले.
प्रशिक्षण व उपक्रम
प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थी
व कर्मचारी यांच्याकडून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा सुरक्षित व जबाबदार वापर करण्याची
प्रतिज्ञा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. सदर प्रतिज्ञेसाठी
🔗 https://www.staysafeonline.in/pledge
या संकेतस्थळाचा वापर
करण्यात आला
तसेच सायबर सुरक्षिततेबाबत
जागरूकता वाढविण्याच्या उद्देशाने ऑनलाइन सायबर सुरक्षा विषयक प्रश्नमंजुषा
(Online Quiz) आयोजित करण्यात आली. प्रश्नमंजुषेसाठी
🔗 https://assessment.isea.app/instructions/sid2026
या दुव्याचा उपयोग करण्यात
आला. या उपक्रमात विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
तसेच या ऑनलाइन उपक्रमांमध्ये
सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रमाणपत्रे (Online Certificates) प्रदान
करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयात
विशेष उपक्रम
सेफर इंटरनेट डे निमित्त
जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे विशेष डिजिटल जनजागृती डॅशबोर्ड प्रदर्शित करण्यात
आला. या डॅशबोर्डद्वारे नागरिकांना डिजिटल सुरक्षिततेच्या उपाययोजना, सायबर हल्ल्यांपासून
संरक्षणाचे मार्ग तसेच सुरक्षित ऑनलाइन व्यवहार याविषयी माहिती देण्यात आली. प्रदर्शित
व्हिडिओ व प्रतिमा नागरिकांसाठी अत्यंत माहितीपूर्ण ठरल्या.
कार्यक्रमाचे उद्दिष्ट
व परिणाम
या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थी
तसेच नागरिकांना सायबर सुरक्षेच्या धोरणांबाबत आणि डिजिटल साधनांचा जबाबदारीने वापर
करण्याबाबत जागरूकता मिळाली. वाढत्या इंटरनेट वापराच्या आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या
(AI) पार्श्वभूमीवर प्रत्येकाने स्वतःच्या डिजिटल सुरक्षिततेबाबत सजग राहणे अत्यंत
आवश्यक आहे.
मुख्य उद्दिष्टे :
इंटरनेट व कृत्रिम बुद्धिमत्ता
(AI) यांचा सुरक्षित व जबाबदार वापर याबाबत जनजागृती करणे
सायबर स्वच्छतेच्या
(Cyber Hygiene) उत्तम पद्धतींचा प्रसार करणे
प्रमुख सायबर धोके व त्यावरील
प्रतिबंधात्मक उपायांबाबत माहिती देणे
इंटरनेट सुरक्षितता व
सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण
वैयक्तिक माहिती व गोपनीयतेचे
संरक्षण
डिजिटल जबाबदारी व योग्य
ऑनलाइन वर्तन
सायबर धमकी व फसवणुकीपासून
बचाव
शिक्षण, संशोधन व सर्जनशीलतेसाठी
तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर.
००००००
No comments:
Post a Comment