वृत्त क्रमांक 499
परदेशात
शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
अर्ज करण्यास 6 जून पर्यंत मुदतवाढ
नांदेड दि. 15 मे : इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्यावतीने राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील मुला-मुलींना परदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना सन 2025-26 साठी मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता अर्ज करण्यास 6 जून 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
या योजनेत 75 विद्यार्थ्यांकरिता 9 एप्रिल रोजी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करण्याची मुदत 17 मे 2025 पर्यंत देण्यात आली होती. परंतू आता 20 दिवसाची म्हणजे 6 जून 2025 पर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी,
असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहाय्यक
संचालक शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment