वृत्त क्रमांक 498
दहावी पुरवणी परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सुरू
नांदेड दि. 15 मे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावीसाठी पुरवणी परीक्षा जून-जुलै 2025 मध्ये घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी केले आहे.
इयत्ता दहावीच्या फेब्रुवारी-मार्च 2025 परीक्षेचा निकाल 13 मे रोजी ऑनलाईन जाहीर झाला असून या अनुषंगाने पुरवणी परीक्षा आयोजित करण्यात आल्या आहेत. या परीक्षेस पुनर्परिक्षार्थी, यापूर्वी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (फेब्रुवारी-मार्च 2025 परीक्षेस प्रविष्ट न झालेले) व जून-जुलै 2025 परीक्षेसाठी नावनोंदणी केलेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी आयटीआय विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थ्यांची अर्ज (औद्यागिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहेत. या परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षेची अर्ज ऑनलाईन पद्धतीने इयत्ता दहावीसाठी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरावयाची असून त्यांच्या तारखा पुढीलप्रमाणे आहेत.
नियमित शुल्कासह विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे भरावयाची मुदत 15 ते 24 मे 2025 पर्यंत तर विलंब शुल्कासह 25 ते 29 मे 2025 पर्यंत राहील. माध्यमिक शाळांनी आरटीजीएस, एनईएफटीद्वारे रक्कम भरावयाची मुदत शुक्रवार 30 मे 2025 पर्यंत आहे. त्याचबरोबर माध्यमिक शाळांनी परीक्षा शुल्क आरटीजीएसद्वारे भरणा करणे व आरटीजीएस, एनईएफटी पावती, चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रिलिस्ट विभागीय मंडळाकडे जमा करावयाची मुदत सोमवार 2 जून 2025 पर्यंत आहे.
सर्व विद्यार्थ्याची आवेदनपत्रे भरून SUBMIT केल्यानंतर आवेदनपत्रे भरावयाच्या कालावधीमध्ये माध्यमिक शाळांच्या लॉगिनमधून Pre-List उपलब्ध करुन दिलेली असेल, माध्यमिक शाळांनी त्याची प्रिंट काढून विद्यार्थ्यांमार्फत आवेदनपत्रात नमूद केलेली सर्व माहिती जनरल रजिस्टरनुसार पडताळून ती अचूक असल्याची खात्री करावी. सदर प्रिलिस्टवर माहितीची खात्री केल्याबाबत संबंधित विद्यार्थ्याची स्वाक्षरी घ्यावी. त्याचप्रमाणे पडताळणी केल्याबाबत मुख्याध्यापकांनी प्रिलिस्टच्या प्रत्येक पानावर शिक्क्यासह स्वाक्षरी करावी.
इयत्ता दहावी परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यानी आवेदनपत्रे त्यांच्या माध्यमिक शाळेमार्फत भरावी. सर्व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी पुढील महत्त्वाच्या बाबी विचारात घेणे आवश्यक आहे.
ऑनलाईन अर्ज भरतांना फेब्रुवारी-मार्च 2025 परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची त्या परीक्षेतील माहिती आवेदनपत्रात ऑनलाईन घेता येईल. श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी असलेल्या अटी व शर्तीनुसार श्रेणीसुधार करू इछिणाऱ्या फेब्रुवारी-मार्च 2025 परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यासाठी जून-जुलै 2025, फेब्रुवारी-मार्च 2026 व जून-जुलै 2026 अशा लगतच्या तीन संधी उपलब्ध राहतील याची नोंद घ्यावी.
कौशल्य सेतू अभियानाचे Transfer of Credit मागणाऱ्या विद्यार्थ्यांनी देखील ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरून विषयासमोर Transfer of Credit ची नोंद करावी. याशिवाय संबंधित विद्यार्थ्यांनी प्रचलित पद्धतीने आवेदनपत्र व आवश्यक कागदपत्रे याची हार्ड कॉपी विभागीय मंडळात जमा करावी.
सर्व माध्यमिक शाळांनी मंडळाच्या अधिकृत वेबसाईटद्वारे प्राप्त ऑनलाईन चलनावर नमूद केलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या Virtual Account मध्ये कोणत्याही बँकेमधून NEFT / RTGS द्वारे चलनाप्रमाणे अचूक शुल्क रकमेचा भरणा करण्यात यावा. यापूर्वी वापरात असणाऱ्या Bank Of India/ HDFC Bank/ Axis Bank च्या जुन्या चलनाचा वापर करण्यात येऊ नये. त्याचप्रमाणे मंडळात रोख स्वरूपात शुल्क स्विकारले जाणार नाही.
माध्यमिक
शाळांनी सादर केलेली सर्व आवेदनपत्रांचे विहीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय
संबंधितांची प्रवेशपत्रे उपलब्ध करून दिली जाणार नाहीत. नियमित व विलंब शुल्काने आवेदनपत्रे सादर करण्याच्या तारखांना
मुदतवाढ देण्यात येणार नाही, याची सर्व संबंधितांनी नोंद
घेण्यात यावी. अतिविलंब शुल्काने आवेदनपत्रे भरण्याच्या तारखा यथावकाश कळविण्यात
येतील, असेही आवाहन राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ
यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment