Thursday, April 17, 2025

 वृत्त क्रमांक 399

24 एप्रिल रोजी  दिशा समितीच्या बैठकीचे आयोजन 

नांदेड दि. 17 एप्रिल :- जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) समितीची बैठक गुरुवार 24 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन, नांदेड येथे होणार आहे.तरी सर्व कार्यालय प्रमुखांनी अद्यावत माहितीसह बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा दिशा समितीचे सदस्य सचिव राहुल कर्डिले यांनी केले आहे. 

                                                                                                                                                                जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा)  समितीचे बैठक खासदार तथा समितीचे पदसिध्द अध्यक्ष रविंद्र वसंतराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार 24 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11.30 वा कै. डॉ. शंकरराव चव्हाण, नियोजन भवन, मुख्य सभागृह पहिला मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे. 

या बैठकीसाठी सर्व कार्यालय प्रमुखांनी आपल्या विभागाच्या माहितीसह, मागील बैठकीचे अनुपालन व सन 2024-25 चा आर्थिक प्रगती अहवाल एकूण प्राप्त निधी, एकूण खर्च, खर्चाची एकूण टक्केवारी  जि.ग्रा.वि.यं.नांदेड या कार्यालयाकडे तात्काळ पाठवावी व कार्यालय प्रमुखांनी अद्यावत माहितीसह बैठकीस उपस्थित राहावे, असे जिल्हाधिकारी तथा दिशा समितीचे सदस्य सचिव नांदेड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. 

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक 555 विकसित कृषी संकल्प अभियानाची  कृषी विज्ञान केंद्र सगरोळीतुन उत्साहात सुरुवात नांदेड दि. 29 मे :- कृषी विज्ञान केंद्र सगर...