Thursday, April 17, 2025

 वृत्त क्रमांक 402

जलसंपदा विभागाच्या सर्व कार्यालयात स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय स्वच्छता मोहिम

 नांदेड दि. 17 एप्रिल :- जलसंपदा विभागातर्गत 15 ते 30 एप्रिल 2025 या कालावधीत जलव्यवस्थापन कृती पंधरवडा राबविण्यात येत आहे. या पंधरवड्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. याअंतर्गत तीसऱ्या दिवशी जिल्ह्यातील सर्व कार्यालयामध्ये "स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय मोहिम राबविण्यात आली. 

                                                                                                                                                                          जलसंपदा विभाग, नांदेड पाटबंधारे मंडळ, नांदेड अधीक्षक अभियंता अ.आ. दाभाडे पालक अभियंता नांदेड जिल्हा यांच्या अधिपत्याखाली आज "स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय, व जलपुनर्भरन अन्वये नांदेड पाटबंधारे मंडळ नांदेड अंतर्गत असलेल्या सर्व विभागीय कार्यालये, उपविभागीय कार्यालये, सर्व शाखा कार्यालये येथे सर्व कार्यालयात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. 

कार्यकारी अभियंता, नांदेड पाटबंधारे विभाग, या विभागीय कार्यालयात जल पुनर्भरण कार्यक्रमांतर्गत वरिष्ठ भुवैज्ञानिक भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रना डॉ. भालचंद्रजी संगनवार यांनी सर्व अधिकारी / कर्मचारी यांना जलपुनर्भरणाबाबत प्रशिक्षण दिले. यावेळी अधीक्षक अभियंता अ.आ.दाभाडे यांच्यासह सर्व अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.

00000




No comments:

Post a Comment

    वृत्त क्रमांक   507 वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना नांदेड, दि. १७:- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र म...