Thursday, January 6, 2022

 प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने

सुट्टीच्या दिवशी पक्की अनुज्ञप्ती चाचणी 

नांदेड (जिमाका) दि. 6 :- प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेडच्यावतीने शनिवार 8, 15 व 29 जानेवारी 2022 या सुट्टीच्या दिवशी पक्की अनुज्ञप्ती चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरासाठी 7 जानेवारी 2022 रोजी कार्यालयीन वेळेत अपॉईन्टमेंट निर्गमीत करण्यात येतील. इच्छूक अर्जदारांनी उपलब्ध अपॉईन्टमेट घेऊन कोरोना लस घेतल्याचे प्रमाणपत्रासह पक्की अनुज्ञप्ती चाचणीसाठी दिलेल्या वेळेवर उपस्थित रहावे. दिवशी आपत्कालीक परिस्थिती निर्माण झाल्यास शिबिराच्या तारखेत बदल होऊ शकतो, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक सेवा संकल्प अभियानांतर्गत 62 बालकांना मिळणार नवी दृष्टी • जिल्हा रुग्णालयात केली 171 बालकांची नेत्रतपासणी • जालना येथील ...