नांदेड जिल्ह्यात 2 व्यक्ती कोरोना बाधित तर दोन कोरोना बाधित झाले बरे
नांदेड (जिमाका) दि. 31 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 40 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे 2 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 742 एवढी झाली असून यातील 88 हजार 58 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 23 रुग्ण उपचार घेत असून 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 661 एवढी आहे. आजच्या बाधितामध्ये आरटीपीसआर तपासणीद्वारे मुदखेड येथे 1 व उमरी 1 असे एकुण 2 बाधित आढळले आहेत.
आज जिल्ह्यातील 2 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृह विलगीकरण 2 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
आज 23 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 7, किनवट कोविड रुग्णालय 1, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 7, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 8 व्यक्ती उपचार घेत आहेत.
आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 128, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 145 खाटा उपलब्ध आहेत.
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची
संक्षिप्त माहिती.
एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 10 हजार 634
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 7 हजार 635
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 742
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 88 हजार 58
एकुण मृत्यू संख्या-2 हजार 661
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.4 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-8
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-23
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3
00000
No comments:
Post a Comment