Thursday, February 27, 2020


  मोटार सायकलसाठी नवीन मालिका
नांदेड, दि. 27 :- मोटार सायकलसाठी MH 26-BT ही नविन मालिका सोमवार 2 मार्च 2020 पासून सुरु होत आहे. ज्या अर्जदारांना पसंती क्रमांक घ्यावयाचा आहे त्यांचे (आधारकार्ड, पॅनकार्ड मोबाईल नंबर -मेलसह) अर्ज 3 मार्च 2020 रोजी दुपारी 2.30 पर्यंत स्विकारण्यात येणार आहेत. त्यानंतर पसंती क्रमांकासाठी अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत.
ज्या पसंती क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास 4 मार्च 2020 रोजी सकाळी 11.30 वा. कार्यालयात त्याची यादी प्रदर्शित करण्यात येईल Text message द्वारे संबंधीत अर्जदारास कळविण्यात येईल. नागरिकांनी याबाबतची नोंद घ्यावी , असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक   कृष‍ि विभागाची धडक कारवाई   नांदेड जिल्हयामधील दहा कृष‍ि न‍िवीष्ठा केंद्राचे परवाने निलंबीत   दोन परवाने कायमस्वरुपी र...