Thursday, February 27, 2020


बी.एस.चार वाहनाची नोंदणी
20 मार्च पूर्वी करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 27 :- मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशान्वये भारतात सद्य:स्थितीत वाहनांसाठीची प्रदुषण मानके बी.एस.चार चालू आहेत. ही मानके दि. 31 मार्च 2020 नंतर बंद केली जातील. कोणत्याही बी.एस.चार वाहनाची नोंदणी त्यानंतर केली जाणार नाही. वाहनाचे नोंदणी शुल्क, कर आदी भरलेला असला तरीही  31 मार्च 2020 नंतर बी.एस.चार वाहनांची नोंदणी होणार नाही.
सर्व वाहन वितरकांना वाहन धारकांनबी. एस. चार वाहन काही कारणास्तव नोंदणी करावयाचे प्रलंबित असेल जसे, वित्तदात्याकडील थकीत प्रकरण, वाहन मालकाचे आजारपण, वाहन मालकाचा अपघात इ. तर अशा वाहनाची नोंदणी 20 मार्च 2020 पूर्वी पूर्ण करुन घ्यावी. संगणकीय वाहन प्रणालीवर कोणत्याही परिस्थितीत 31 मार्च 2020 नंतर फक्त बी.एस.सहा मानकांच्या वाहनांची नोंदणी करता येणार आहे.
गुढीपाडव्यासाठी वाहन खरेदी करण्यासाठी इच्छुकांन25 मार्च 2020 तत्पूर्वी किमान 6 ते 7 दिवस अगोदर आपण आपल्या वाहनांच्या कागदपत्रांची पूर्तता (जसे की शुल्क, कर इ. भरणे) पूर्ण करुन घ्यावी. जेणेकरुन एचएसआरपी नंबर प्लेट बसवून वितरक आपणाला वाहन गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर  25 मार्च 2020 रोजी वाहन डिलिव्हरी देवू शकेल.
मा. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पाहता संगणकीय प्रणालीतील बदल ाहता वाहन वितरक वाहन मालकांची कोणत्याही प्रकारची बी.एस.चार मानकांच्या वाहनांची नोंदणी अर्जाचा विचार केला जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी आपल्या वाहनाची नोंदणी प्रक्रीया 31 मार्च 2020 पूर्वीच पूर्ण करावी, असे आवाहन नांदेडचे प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले आहे.  
00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...