Wednesday, January 8, 2020


राष्‍ट्रीय ग्राहक दिन आज  
बचत भवन येथे साजरा होणार
नांदेड, दि. 8 :- ग्राहकांच्‍या हक्‍कांची व ग्राहक संरक्षण कायदा याची माहिती जनतेत होण्‍याच्‍या उद्शाने प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी राष्‍ट्रीय ग्राहक दिन मंगळवारी 9 जानेवारी 2020 रोजी जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड येथील बचत भवन येथे सकाळी 1.30 वा. साजरा करण्‍यात येणार आहे.
     या कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे हे राहतील व कार्यक्रमाचे अध्‍यक्ष जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्‍यक्ष किशोरकुमार रं. देवसरकर राहतील. प्रमुख वक्‍ते रविंद्र बिलोलीकर सदस्‍य जि.ग्रा.त.नि. मंच, नांदेड, डॉ बा.दा. जोशी माजी अशासकीय सदस्‍य जिल्‍हा ग्राहक संरक्षण परिषद, नांदेड पुरूषोत्‍तम अमिलकंठवार जिल्‍हाध्‍यक्ष अ.भा.ग्राहक पंचायत विभाग नांदेड हे राहतील.
     नागरिक व ग्राहकांनी 9 जानेवारी 2020 रोजी साजरा होणा-या राष्‍ट्रीय ग्राहक दिनाच्‍या कार्यक्रमास जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड येथील बचत भवन येथे सकाळी 1.30 वाजता उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन जिल्‍हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी केले आहे. 
00000

No comments:

Post a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #शेतकरी Maharashtra DGIPR ...