सार्वजनिक
बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी
कार्यालयातून
सुरू केले कामकाज
मुंबई, दि. 8 : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री अशोक चव्हाण
यांनी आज मंत्रालयातील कार्यालयातून कामकाजास प्रारंभ केला. यावेळी त्यांनी पहिला
फोन लेकीला लक्ष्मी मानून तिच्या पावलाच्या ठशाने वाहनाची पुजा करणाऱ्या
कोल्हापुरातील नागेश पाटील या पित्याला लावला आणि त्याच्याशी संवाद साधला.
श्री.
चव्हाण यांनी खातेवाटप झाल्यानंतर तातडीने कामकाज सुरू केले होते. कार्यालय
व्यवस्थित झाल्यानंतर त्यांनी आज कार्यालयात प्रवेश करून कामकाजास औपचारिक सुरूवात
केली. त्यावेळी श्री. चव्हाण म्हणाले की, "सार्वजनिक
बांधकाम मंत्री म्हणून अविकसित भागाला न्याय देण्याची माझी भूमिका आहे. मध्यंतरी मी टीव्हीवर बातमी बघितले की, लहान मुलांना पायी नदी ओलांडून शाळेत जावे लागते. अशी तातडीची गरज असेल
तिथे पहिले निधी देऊ. पायाभूत सुविधा उत्तम असल्या पाहिजे. कमतरता असेल तिथे
निश्चित लक्ष देऊ".
लेकीवर
अपार प्रेम करणाऱ्या पित्यास फोन करून कामकाजाची सुरुवात
श्री.
चव्हाण यांनी कालच श्री. पाटील यांच्या व्हॉट्सअपवर आलेला टिकटॉकचा हा व्हिडीओ
ट्विट केला होता. मूळ कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी असलेले नागेश पाटील यांनी दोन
आठवड्यांपूर्वी नवीन वाहन खरेदी केले होते. त्या वाहनाची पूजा करताना त्यांनी
आपल्या दोन वर्षीय मुलीचे पाय कुंकवात बुडवून लक्ष्मीची पावले म्हणून त्यांची छाप
नव्या गाडीच्या बोनेटवर उमटवली होती. लेकीवरील अपार प्रेम व्यक्त करणारा हा
व्हिडिओ अशोक चव्हाण यांच्या हृदयाला स्पर्श करून गेला. त्यांनी आपल्या ट्विटर आणि
फेसबुकवर हा व्हिडीओ शेअर करून एक पिता म्हणून आपल्या भावनादेखील व्यक्त केल्या. श्री.चव्हाण
यांनी आज सकाळी कार्यालयात आल्यानंतर पहिला फोन श्री. पाटील यांना केला व
त्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.
००००
No comments:
Post a Comment