Thursday, May 30, 2019


जि. प. कर्मचाऱ्यांचे बदल्यांच्या
समुपदेशनाचे वेळापत्रक जाहीर
नांदेड दि. 30 :- जिल्हा परिषदेच्या गट क कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदलीबाबत शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार सार्वत्रिक बदल्या 2019 साठी नांदेड जिल्हास्तरावरील बदल्यांचे समुपदेशनाचे वेळापत्रक निश्चित केले आहे. त्यानुसार वेळापत्रकाची जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत गट क कर्मचाऱ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
जिल्हा परिषद सार्वत्रिक बदल्या सन 2019 चे वेळापत्रक पुढील प्रमाणे राहील.  शनिवार 1 जून 2019 रोजी बांधकाम विभाग सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत, लघुपाटबंधारे विभाग सकाळी 11 ते दुपारी 12 वाजेपर्यंत, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत. महिला व बालकल्याण विभाग दु. 1 ते 3 वा. कृषि विभाग दु. 3 ते 4 वा., पशुसंवर्धन विभाग 4 ते बदली प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत. रविवार 2 जून 2019 रोजी सामान्य प्रशासन विभाग सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत. अर्थ विभाग दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत. शिक्षण विभाग दुपारी 3 ते बदली प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत. सोमवार 3 जून 2019 रोजी ग्रामपंचायत विभाग सकाळी 10 ते बदली प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत. मंगळवार 4 जून 2019 रोजी आरोग्य विभाग सकाळी 10 ते बदली प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत.
या सर्व समुपदेशनाचे ठिकाण कै. यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद नांदेड हे राहील. या बदलीच्या वेळापत्रकात काही बदल झाल्यास तसे कळविण्यात येईल, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
000000


No comments:

Post a Comment

  मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण २०२६ प्रारूप मतदार यादीत आजच आपले नाव तपासा मतदार मदत क्रमांक १८०० २२ १९५० वर संपर्क करा #मतदारय...