दिवाळीसाठी फटाका दुकानांच्या
परवान्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड दि. 23
:- दिपावली उत्सव 6 नोव्हेंबर
ते 9 नोव्हेंबर
2018
या कालावधीत साजरा होणार आहे. या कालावधीतील तात्पुरती फटाका विक्रीची दुकाने सुरु
करण्यासाठी परवाना घेणे आवश्यक आहे. नांदेड महानगरपालिका हद्दीतील तात्पुरते
फटाका परवाना जिल्हादंडाधिकारी तर जिल्हयातील सर्व उपविभागीय दंडाधिकारी त्यांच्या
कार्यक्षेत्रातील तात्पुरता फटाका विक्री परवाने देतील. त्यासाठी उपविभागीय
अधिकाऱ्यांना अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. इच्छुकांचे विहित नमुन्यातील अर्ज 4 ऑक्टोंबर ते 19 ऑक्टोंबर 2018
पर्यंत विक्री व स्विकारले जातील,
असे जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
नांदेड
महानगरपालिका हद्दीतील तात्पुरता फटाका परवाना सेतू समिती जिल्हाधिकारी कार्यालय
नांदेड यांच्या मार्फत
व जिल्हयातील उपविभागीय कार्यालयामार्फत त्या कार्यक्षेत्रातील तात्पुरते फटाका
परवाना अर्ज विस्फोटक अधिनिमय 2008 नुसार 4 ऑक्टोंबर ते 19 ऑक्टोंबर 2018 या कालावधीत विक्री व स्विकारले जातील.
तात्पुरता
फटाके विक्री परवानासाठी विहित नमुन्यात पुढील कागदपत्रांसह अर्ज आपल्या कार्यक्षेत्रातील कार्यालयात दाखल करावेत. नमुना AE-5 मधील
अर्ज, परवाना घेण्याच्या दुकानाचा नकाशा ज्यात साठा व विक्री करावयाचे ठिकाण, साठवणूक
क्षमता,
त्याचा मार्ग परिसरातील सुविधा इत्यादी तपशील
दर्शविण्यात यावा. The Explosive Rules 2008
मधील नियम 86(3) अन्वये सदर व इतर दुकान यात किमान 15 मीटरचे अंतर असणे आवश्यक आहे. नकाशात दुकान क्रमांक नमुद असावा. नकाशा
स्थानिक प्राधिकरणाकडून साक्षांकित केलेला असावा. अर्जदाराचे दोन पासपोर्ट आकाराचे
छायाचित्र. परवाना शुल्कासाठी 500 रुपये चलनाची प्रत जोडलेली असावी. एकाच परिसरात
सामुहिकरित्या दुकाने टाकण्यात येत असल्यास संबंधीत अर्जदारास देण्यात आलेला
दुकान क्रमांक नमुद असलेले प्रमाणपत्र (Allotment Letter).
आयुक्त नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड किंवा संबंधीत नगरपरिषद, नगरपंचायत
यांचे मुख्याधिकारी किंवा ग्रामपंचायत कार्यालय यांचे नाहरकत प्रमाणपत्र. संबंधीत पोलीस स्टेशनचे
चारित्र्य प्रमाणपत्र व नाहरकत प्रमाणपत्र. जागेच्या मालकी हक्काचा पुरावा. नोंदणीकृत,
मान्यता प्राप्त असोसिएशन मार्फत तात्पुरता फटाका परवानासाठी अर्ज केल्यास
जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात येणाऱ्या परवान्यातील नमूद ज्या अटी व
शर्तीनुसार संबंधीत दुकानांची उभारणी करणे बंधनकारक राहील. तसेच कोणत्याही
विस्फोटक नियमांचे व परवान्यातील अटी व शर्तींचे उल्लंघन होऊन कोणताही अनुचित
प्रकार घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत असोसिएशनची असले याबाबत संबंधीत
असोसिएशनकडील शपथपत्र. दुकानाच्या ठिकाणी करण्यात आलेली व्यवस्था तपशील
अग्निशमन दल, सुरक्षा रक्षक इ.. इतर अटी व शर्ती नियम 84 नुसार.
अर्जदाराने
विहित नमुन्यातील सर्व कागदपत्राची पुर्तता केली असल्याची खात्री झाल्यानंतर
सबंधीत कार्यालयाकडून चलन नोंदवून देण्यात येईल. चलनाद्वारे शुल्क शासन जमा झाल्यानंतर
चलनाची प्रत अर्जासोबत जोडून, सबंधीत परिपुर्ण अर्जाच्या
अनुषंगाने 22
ऑक्टोंबर व 23 ऑक्टोंबर
2018
या कालावधीत नांदेड महानगरपालिका हद्दीतील परवाने जिल्हादंडाधिकारी नांदेड यांच्यामार्फत
तसेच उपविभागीय दंडाधिकारी यांच्या हद्दीतील परवाने संबंधीत उपविभागीय
दंडाधिकारी यांच्यामार्फत दिले जातील.
या कालावधीत The Explosive Rules
2008 मधील नियम 84 (6) अन्वये एकाच ठिकाणी 50 पेक्षा जास्त
दुकानास अनुज्ञाप्ती दिली जाणार नाही. विहित केलेल्या साठा व विक्री
परिणामापर्यतचाच व्यवहार करता येईल. याबाबत The Explosive Rules 2008
मधील नियमानुसार व SET-X ते SET-Xv मधील
निर्देशानुसार साठा नोंदवही तयार करुन ती तपासणीसाठी उपलब्ध ठेवावी लागेल. The Explosive Rules
2008 अन्वये अनाधिकृतपणे विस्फोटक साठा व विक्री करणे हा
गंभीर स्वरुपाचा अपराध असून तो दंडनीय आहे, याची नोंद घ्यावी असेही
जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने कळवले आहे.
000000
No comments:
Post a Comment