पत्रकार परिषद निमंत्रण ई-मेल संदेश
दि. 10 जुलै 2018
प्रति ,
मा. संपादक / प्रतिनिधी
दैनिक वृत्तपत्र / दूरचित्रवाणी / केबल टि.व्ही.
नांदेड जिल्हा
विषय - पत्रकार परिषदेचे निमंत्रण...
महोदय ,
मा. सचिव, राज्य सहकारी निवडणूक
प्राधिकरण महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे दि. 7 जुलै 2018 रोजीच्या पत्राच्या अनुषंगाने कृषि उत्पन्न बाजार समिती
धर्माबाद व मुदखेड जिल्हा नांदेड या बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम दिनांक 12
जुलै 2018 ते दि. 12 ऑगस्ट 2018 या कालावधीचा घोषीत झाला आहे.
या निवडणूक कार्यक्रमाची माहिती
देण्यासाठी बुधवार दि. 11 जुलै 2018 रोजी जिल्हाधिकारी मा. श्री. अरुण डोंगरे
यांची पत्रकार परिषद जिल्हाधिकारी नांदेड यांचे कक्षात दुपारी 4.00 वा. आयोजित
केली आहे.
कृपया पत्रकार परिषदेस आपण किंवा आपला प्रतिनिधी,
छायाचित्रकार, कॅमेरामन यांनी वार्तांकनासाठी उपस्थित रहावे, ही विनंती.
वार व
दिनांक - बुधवार,
दि. 11 जुलै 2018
स्थळ - मा. जिल्हाधिकारी नांदेड यांचे कक्षात
वेळ - दुपारी 4.00 वा.
आपला विश्वासू
स्वा /-
(
अनिल आलूरकर )
जिल्हा
माहिती अधिकारी,
नांदेड
No comments:
Post a Comment