Friday, July 20, 2018


माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत
परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
नांदेड दि. 20 :- माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा- जुलै / ऑगस्ट 2018 परीक्षा 17 जुलै ते 4 ऑगस्ट 2018 या कालावधीत नांदेड जिल्ह्यातील 29 परीक्षा केंद्रावर घेण्यात येत आहे. या परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्याचे जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.  
नांदेड जिल्ह्यात दहावीसाठी 20 परीक्षा केंद्र तर बारावीसाठी 9 परीक्षा केंद्रात ही परीक्षा होत आहे. परीक्षेचे कामकाज स्वच्छ व सुसंगत पार पाडण्यासाठी परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात सकाळी 8 ते सायं 6 वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू आहे. त्यानुसार या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी व कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच यावेळेत केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे, असे जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी आदेशात नमूद केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

  मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण २०२६ प्रारूप मतदार यादीत आजच आपले नाव तपासा मतदार मदत क्रमांक १८०० २२ १९५० वर संपर्क करा #मतदारय...