Friday, July 20, 2018


भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
शेतकऱ्यांनी 7 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करावीत  
नांदेड, दि. 20 :- भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सन 2018-19 मध्ये राबविण्यात येणार आहे. या योजनेसाठी नांदेड जिल्ह्यास 490.00 लक्ष रुपयाचे आर्थिक लक्षांक प्राप्त झाले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी विहीत नमुन्यातील अर्ज मंगळवार 7 ऑगस्ट 2018 पर्यंत संबंधीत तालुका कृषि अधिकारी कार्यालयात सादर करावा, से आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे. 
या योजने निवड झालेल्या लाभार्थ्यांनी सोडतीनंतर दोन दिवसात सात-बारा आठ-अ चा उतारा, संयुक्त खातेदार असल्यास सर्व खातेदारांचे संमतीपत्र, हमीपत्र, आधार कार्ड प्रत, जातीचे प्रमाणपत्र (अनु.जाती/अनु.जमाती) आधार संलग्न राष्ट्रीयकृत बँक पासबुकातील प्रथम पानाची प्रत (फोटो सहीत) इ. कागदपत्रे तालुका कृषि अधिकारी कार्यालयात सादर करावीत.
या योजनेंतर्गत फळबाग आंबा कलमे, आंबा कलमे (सधन लागवड), काजु कलमे, पेरु कलमे, पेरु कलमे (सधन लागवड), दाळींब कलमे, संत्रा, मोसंबी, कागदी लिंबु कलमे, संत्रा कलमे (इंडो इस्त्राईल तंत्रज्ञान), नारळ रोपे बानावली, नारळ रोपे टी/डी, सिताफळ कलमे, आवळा कलमे, चिंच कलमे, जांभुळ कलमे, पोकम कलमे, फनस कलमे, अंजीर कलमे, चिकु कलमे इ. तसेच या योजने अंतर्गत कलमांच्या लागवडीला (नारळ वगळता) अनुदान देय राहील. योजनेअंतर्गत फळबागेसाठी ठिबक सिंचन बंधनकारक राहील. फळपिकांचे कलमे / रोपे प्राधान्याने शासकीय, कृषि विद्यापीठ, राष्ट्रीय संशोधन संस्था राष्ट्रीय बागबानी मंडळ, मानांकीत रोपवाटीकेतुनच घेणे बंधनकारक राहील.
प्रत्येक तालुक्यात प्राप्त होणाऱ्या आर्थिक लक्षांकाच्या मर्यादित योजनेच्या निकषानुसार पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल. फळबाग लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम पहिल्या, दुसऱ्या तिसऱ्या वर्षी अनुक्रमे 50, 30 20 टक्के प्रमाणे त्यांच्या आधार लग्न बँक खात्यात अदा करण्यात येईल.
या घटकांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधुन अर्ज भरुन घ्यावा. योजनेच्या सविस्तर माहितीसाठी लाभार्थ्यांनी संबंधीत तालुका कृषि अधिकारी यांचेशी संपर्क करावा. योजनेच्या अटी शर्तींचा भंग झाल्यास लाभार्थी वसुली दंडात्मक कारवाईस प्राप्त राहील. या योजनेचा लाभ घेणेसाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी कार्यालयात अर्ज करावा, सेही आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...