Saturday, February 17, 2018


केळी पिकाचा कृषि संदेश
  नांदेड, दि. 17 :- केळी करपा रोग नियंत्रणासाठी केळीच्या पानावर पिवळे, तपकेरी ठिपके मोठ्या प्रमाणावर आढळून आल्यास केळीच्या पानाचा प्रादुर्भावग्रस्त भाग काढून टाकावा. प्रोपीकोनेझॉल 0.5 टक्के (0.5 मिली) मिनरल ऑईल 1 टक्के (10 मिली) पाण्यात मिसळून फवारणी करावी. केळी फुलकिडी नियंत्रणासाठी केळीच्या कोवळ्या फळावर छोटी अंडी किंवा ठिपके आढळून आल्यास व्हर्टीसोलियम लेकॉनी 3 ग्रॉम / लि. अधिक स्टीकर 1 मिली / लि. किंवा निमार्क 5 टक्के फवारणी करावी, असे आवाहन नांदेडचे उपविभागीय कृषि अधिकारी डॉ. व्ही. व्ही. भरगंडे यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...