Saturday, February 17, 2018


शासकीय तंत्रनिकेतनमध्ये
श्री गुरुगोविंद सिंघजी जयंती उत्साहात साजरी
नांदेड, दि. 17 :- येथील शासकीय तंत्रनिकेतन, नांदेड येथे श्री गुरुगोविंद ससिंघजी यांची 351 मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विजेंद्रसिंघजी कपुर   गुरमितसिंघजी पुजारी गुरुद्वारा यांनी मुलांना श्री गुरु गोविंदससिंघजी यांच्या त्यागाची मानवधर्माच्या शिकवणीची जाणीव करुन दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्रभारी प्राचार्य सी. व्ही. लहाडे उपस्थित होते. तर एनएसबी महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख परविंदर कौर कोल्हापूरे, तेजासिंघजी मुख्यग्रंथी मातासाब गुरुद्वारा यांची प्रमुख उपस्थिती होती.  
            विजेंद्रसिंघजी कपुर यांनी श्री गुरु गोविंदससिंघजी यांच्या कार्याचे महत्व विशद करताना सद्गुण विवेक गुण जीवनात  किती उपयोगी आहे, हे सांगितले. श्री गुरुगोविंदससिंघजी यांनी सर्व धर्मातील लोकांना समानतेचे ज्ञान दिले. शस्त्राचा वापर हिंसेसाठी नसून, अहिंसेसाठी शांततेच्या मार्गाने करावयास सांगितला. शिस्त या शब्दाचा अर्थ शिकणे होय असे सांगितले. गुरमितसिंघजी पुजारी गुरुद्वारा यांनी खालसा पंथाने सर्वच धर्माचा आदर करत केवळ अनिष्ठ बाबींना विरोध केला, साधू संतांचे रक्षण करण्यासाठी दूष्ठांचा समूळ नाश करण्यासाठी कार्य केले असे सांगितले.  डॉ. परविंदर कौर यांनी आपल्या भाषाणात श्रीगुरुनानक हे सर्व मानव जातीधर्मासाठी संत होते असे सांगतानाच श्री गुरुगोविंद सिघजीच्या त्याग बलीदानामुळे भारताच्या इतिहासाला कलाटणी मिळाल्याचे सांगितले. प्राचार्य श्री गुरुबचन सिंघजी शिलेदार यांनी संपुर्ण मानवतावादी विचारवंत असलेल्या श्री गुरुगोविंदससिंघजी यांच्या विचारांची आजही संपुर्ण जगाला आवश्यकता असल्याचे सांगितले.
 प्रसाद जाधव या विद्यार्थ्याने श्री गुरुगोविंदसिंघजी यांच्यावर केलेली स्वत:ची रचना विद्यार्थ्यांसमोर सादर केली. तसेच यावेळी शिख संप्रदायाच्या गुरुच्या जीवनावर आधारीत छायाचित्र प्रदर्शनीचे उद्घाटन यावेळी करण्यात आले. अध्यक्ष समारोपात संस्थेचे  प्रभारी प्राचार्य सी. व्ही. लहाडे यांनी गुरुनानकजींच्या शिकवणीचा अवलंब विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात करावा आणि समाजहितासाठी काम करण्याचे सांगितले.
श्री गुरुगोविंदससिंघजी यांच्या 351 व्या जयंती कार्यक्रमासाठी श्री रणजितसिंघजी कामठेकर, गुरुबचनसिंघजी शिलेदार हरनामसिंघजी मनोत्रार, सुजानसिंघजी कामठेकर, आवर्जुन उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स. सरताज सिंघ,  स. गुरुसिमरन सिंघ, स. उदयपालसिंघ, स. हंसराज सिंघ, स. गगनदिप सिंघ, सरबजोत सिंघ, तेंजिदर कौर, पुनम कौर, कोमल कौर हर्षदीप कौर  यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन किरणज्योत कौर संघ, तरण ज्योत कौर, कुंजीवाले या विद्यार्थीनींनी केले तर यावेळी संस्थेचे उपप्राचार्य  ए. डब्ल्यू. पावडे, प्रा. सकळकळे, प्रा. लोकमनवार, प्रा. एस. पी. कुलकर्णी, श्री. आर. एम.दुलेवाड यांच्यासह संस्थेतील विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
00000

No comments:

Post a Comment