Tuesday, January 23, 2018

अल्पसंख्याक बहुल शाळांना
पायाभूत सुविधेसाठी अनुदान योजना
नांदेड दि. 23 :- अल्‍पसंख्‍याक बहुल शासनमान्‍य खाजगी शाळा, कनिष्‍ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था व अपंग शाळा यांचेसाठी पायाभुत सोयी सुविधा अनुदान योजनेंतर्गत इच्‍छुकानी अर्ज बुधवार 31 जानेवारी 2018 पर्यंत जिल्‍हा नियोजन समिती, जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सादर  करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष उच्चस्तरीय निवड समिती जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांनी केले आहे.
 या योजनेंतर्गत यापुर्वी 5 वेळा अनुदान घेतलेल्‍या शाळा, संस्‍थेला यावर्षी अनुदानासाठी पात्र असणार नाहीत. विहित मुदतीनंतर प्राप्‍त झालेले प्रस्‍ताव ग्राह्य धरले जाणार नाहीत. शासन निर्णय व अर्जाचा नमुना https://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहे. शासन निर्णय दि. 7 ऑक्टोंबर 2015  अन्‍वये जिल्‍ह्यातील धार्मिक अल्‍पसंख्‍याक विद्यार्थी बहुल शासनमान्‍य खाजगी शाळा, कनिष्‍ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था, नगरपालिका / नगरपरिषद शाळा व अपंग शाळा यांचेकडून, शासनमान्‍य खाजगी शाळा, कनिष्‍ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था व नगरपालिका / नगरपरिषद शाळामध्‍ये अल्‍पसंख्‍याक समाजाचे (मुसिलम, बौध्‍द, ख्रिश्चन, जैन, शिख, व पारसी मिळून) किमान 70 टक्के विद्यार्थी शिकत असणे आवश्‍यक आहे. पायाभूत सोयी सुविधा अनुदान योजनेंतर्गत कमाल 2 लाख रुपये अनुदानाचा लाभ घेण्‍यासाठी विहीत नमुन्‍यात अर्ज मागविण्‍यात येत आहेत.
योजनेच्‍या अटी व शर्ती पुढील प्रमाणे आहे. शासन मान्‍यताप्राप्‍त अपंगाच्‍या शाळांमध्‍ये किमान 50 टक्के अल्‍पसंख्‍यांक विद्यार्थी शिकत असणे आवश्‍यक आहे. या योजनेंतर्गत पुढील पायाभूत सुविधांसाठी अनुदान देय आहे. शाळेच्‍या इमारतींचे नुतनीकरण व डागडुजी, ग्रंथालय अद्ययावत करणे, संगणक कक्ष उभारणे / अद्यावत करणे. शैक्षणिक कार्यासाठी आवश्यक फिर्निचर, इन्‍व्‍हर्टरची सुविधा निर्माण करणे, अध्‍ययनाची साधने (Learning Material)/ एल.सी.डी. प्रोजेक्‍टर अध्‍ययनासाठी लागणारे विविध सॉफटवेअर इत्‍यादी. इंग्रजी लॅग्‍वेज लॅब, शुध्‍द पेयजलाची व्‍यवस्‍था करणे, प्रयोगशाळा उभारणे, अद्यावत करणे. प्रसाधनगृह / स्‍वच्‍छतागृह उभारणे डागडूजी करणे, झेरॉक्‍स मशीन, संगणक हार्डवेअर / सॉफ्टवेअरचा समावेश करण्यात आला आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.

00000

No comments:

Post a Comment

राष्ट्रपुरुष महात्मा जोतीराव फुले द्विशताब्दी जन्म वर्ष #MahatmaPhule200 #महात्माफुले200 #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear #महा...