Wednesday, April 12, 2017

आरटीओचे हदगावातील शिबीर 19 एप्रिलला
नांदेड, दि. 12  :- प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेस हदगाव येथे मासिक शिबीर घेण्यात येते. शनिवार 15 एप्रिल रोजी कंधार ऊर्स निमित्त जिल्हाधिकारी यांनी स्थानिक सुट्टी जाहीर केल्यामुळे हदगाव येथे बुधवार 19 एप्रिल 2017 रोजी मासिक शिबीर (कॅम्प) घेण्यात येणार आहे. याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले.

000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक   500   उस्माननगर मंडळाअंतर्गत  छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्‍व समाधान अभियान शिबी राचे आयोजन   लाभार्थ्यांना दिला विविध ...