शालेय मुलांची वाहतूक करणाऱ्या
वाहनांची फेरतपासणी करावी
नांदेड दि. 11 :- उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची
सुरक्षा विषयक फेरतपासणी करण्यात येणार असल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड
यांनी कळविले आहे.
शालेय मुलांची
वाहतूक करण्यासाठी नोंद केलेली वाहने (स्कूल बस) वाहन हे सुरक्षाविषयक तरतुदीचे काटेकोरपणे
पालन करतात किंवा कसे याबाबत ही तपासणी करण्यात येणार आहे. तपासणी पूर्णत: निशुल्क असून मोटार वाहन कायदा कलम 56 अंतर्गत
वाहनाचे जारी केलेले योग्यता प्रमाणपत्र वैध असले तरीही स्कूल बसची चाचणी करुन
घेणे बंधनकारक आहे. तसेच जे स्कूलबस धारक या तपासणीसाठी वाहन
कार्यालयात सादर करणार नाहीत त्यांचा परवाना रद्द करण्यात येवून वाहन तपासणीमध्ये
जप्त करण्यात येईल.
सर्व
स्कूल बसचे चालक, मालक यांनी आपल्या वाहनाचे वैध कागदपत्रे व
वाहनाचा परवाना इत्यादीसह वाहनासोबत
कार्यालयात तपासणीसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन
प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000000
No comments:
Post a Comment