Sunday, February 9, 2020


जिल्ह्यातील  विकास कामांना गती देणार : पालकमंत्री अशोक चव्हाण
नांदेड, दि. 9 :- जिल्ह्यातील विकास कामांना गती देणार आहे . त्या अनुषंगाने नवीन कामांचे प्रस्ताव द्यावेत तसेच  मुदखेडकरांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासणार नाही यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आज मुदखेड येथे केले .
मुदखेड नगरपरिषदेने विकसीत केलेल्या अभ्यासिकेचे उद्घाटन पालकमंत्री श्री .चव्हाण यांच्या हस्ते  मुदखेड नगरपरिषद कार्यालयात  झाले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी मुदखेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मुजीब अन्सारी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव तिडके,
 जिल्हा परिषदेचे सभापती बाळासाहेब रावणगावकर, सभापती श्री नाईक, उपविभागीय अधिकारी पवन चांडक, तहसीलदार दिनेश झांपले, नायब तहसिलदार तथा नगरपरिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी संजय नागमवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी नगरपरिषदेच्या विकास कामांच्या अनुषंगाने महाराष्ट्र नगरोत्थान अभियान राज्यस्तर अभियानांतर्गत उमरी तालुक्यातील बळेगाव येथून मुदखेड शहरासाठी पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करणे. मुदखेड नगरपरिषदेची हद्दवाढ करणे. शहरातील पाणी टंचाईबाबत आढावा. बौध्द स्मशानभूमी व इतर समाजाच्या स्मशान भूमीसाठी रस्त्यासाठी भूसंपादन करणे. कालेजी देवी ते रेल्वे उड्डाण पुलापर्यंत पाणंद रस्ता विकसित करणे. रेल्वे भुयारी पोच मार्ग चालु करण्यासाठी भूसंपादन करणे. भोकर चौक ते न्याहाळीकडे जाणाऱा रस्ता जोडण्यासाठी रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम करणे. नगरपरिषदेतील रिक्त पदे भरणे. प्रधानमंत्री आवास योजना राबविणे. एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत घरकुलाची थकीत देयके देणे. श्रीखंडोबा देवस्थानाचा तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत समावेश करणे. शहरात सांस्कृतिक सभागृह बांधकाम करणे. मील्लतनगर ते वसंतनगर तांडा ते उमरीरोडपर्यंत रस्त्याचे भूसंपादन करणे व रस्ता विकसित करणे यासह शहरातील विविध विकास कामांचा आढावाही श्री .चव्हाण यांनी घेतला . मुदखेड शहरात चालू असलेली विकास कामे चांगली, दर्जेदार, पारदर्शकपणे तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश देवून नवीन विकास कामांचे प्रस्ताव शासनास सादर करण्याबाबतही करावेत सूचनाही त्यांनी केली .
कार्यक्रमाची प्रस्तावना मुदखेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मुजीब अन्सारी यांनी केली. यावेळी माधव कदम यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमासाठी लक्ष्मण देवदे, बालाजी गोडसे, शेख करीम शेख सादात, बंदे अलीखाँ पठाण, इम्रान मच्छीवाले, संजय आऊलवार, चांदु चमकुरे, चांदु बोकेफोड, उमाकांत घोंगडे , उत्तम चव्हाण, बबलु शेठ, रावसाहेब चौदंते, किशोर पारवेकर आदींची उपस्थिती होती.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुदखेड नगरपरिषद कर्मचारी रामेश्वर वाघमारे,
 अनंत कुलकर्णी, दिलीप पवार, मोहन कवळे, नितीन चव्हाण, पांडूरंग मोरे, म. यूनूस सैफुलहक, भीसे गंगाधर, रमेश सावंत, मोहन पांचाळ, गणेश वड्डे आदींनी परीश्रम घेतले.
00000









Friday, February 7, 2020


पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा दौरा
नांदेड दि. 7 :- राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शनिवार 8 फेब्रुवारी 2020 रोजी हैद्राबाद येथून विमानाने सकाळी 10.30 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. दुपारी 2 वा. संस्कृति संवर्धन मंडळाच्या हिरक महोत्सवी वर्ष समारोप समारंभाच्या कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- सगरोळी ता. बिलोली जि. नांदेड. सायं 5.30 वा. नक्श मेन्स ॲव्हॅन्यु या दालनाच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- सन्मान प्रेस्टीज समोर रेल्वे स्टेशन रोड नांदेड. सायं 7 वा. धम्मपरिषदेच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती. स्थळ- लहान ता. अर्धापूर जि. नांदेड.
रविवार 9 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 11 वा. अशोक चव्हाण चषक क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती. स्थळ- श्री गुरुगोविंदसिंघजी स्टेडीयम नांदेड. दुपारी 12.30 वा. अखंड शिवनाम सप्ताह व परम रहस्य पारायण समाप्ती सोहळा कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- निवघा ता. मुदखेड जि. नांदेड. दुपारी 2 वा. मुदखेड नगरपालिका आढावा बैठक. दुपारी 3 वा. मुदखेड नगरपालिका अभ्यासिका उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- नगरपालिका मुदखेड मागील प्रांगण मुदखेड. सायं 4 वा. अभ्यागतांच्या भेटीसाठी राखीव. स्थळ शासकीय विश्रामगृह मुदखेड.
00000


महिलांसाठी विनामुल्य अभ्यासिका
नांदेड दि. 7 :-जिल्ह्यातील बेरोजगार, स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या होतकरू महिला उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र, कैलासनगर वर्कशॉप रोड नांदेड यांच्या मार्फत विनामुल्य अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे.
या अभ्यासिकेमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलींसाठी ग्रंथालय विभागामध्ये प्रवेश देणे सुरु आहे. या ग्रंथालय विभागामध्ये वाचनासाठी विविध स्पर्धा परिक्षेची पुस्तके उपलब्ध असुन सर्व प्रकारची वर्तमानपत्रे वाचनासाठी  व्यवस्था करण्यात आली आहे. महिलांना स्वंतत्र्य स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची  व्यवस्था आहे. त्यासाठी अभ्यासिकेत मोफत प्रवेश देणे चालु असुन स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या होतकरू महिला उमेदवारांनी शासनाच्या या मोफत अभ्यासिकेचा जास्तीतजास्त लाभ घेऊन स्वबळावर उभे राहण्यासाठी प्रयत्नशील असावे, असे आवाहन प्र. सो. खंदारे सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन  केंद्र नांदेड यांनी केले आहे.
000000

Thursday, February 6, 2020


राष्ट्रीय लोकअदालतीचे
जिल्ह्यात शनिवारी आयोजन
नांदेड दि. 6 :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड यांच्यावतीने शनिवार 8 फेब्रुवारी 2020 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा न्यायालय नांदेड व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय व सहकार न्यायालय नांदेड येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दिवाणी मो. अ. दावा. , भुसंपादन, किरकोळ दिवाणी अर्ज तसेच बँकाची प्रकरणे आदी न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्रलंबित तडजोड पात्र फौजदारी प्रकरणे या लोकन्यायालयात ठेवण्यात येणार आहेत.
या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये नांदेड जिल्ह्यातील सर्व विधीज्ञ आणि विविध कंपनीचे अधिकारी, भुसंपादन अधिकारी, मनपा, महसूल विभागाचे अधिकारी यांचा सहभाग राहणार आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीत मोठ्या संख्येने प्रकरणात तडजोड होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे. सर्व संबंधित पक्षकारांनी शनिवार 8 फेब्रुवारी 2020 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रकरणे ठेवून आलेल्या संधीचा लाभ घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
00000


महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेता
देवेंद्र फडणवीस यांचा नांदेड दौरा
नांदेड दि. 6 :-  महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाण राहील.
शुक्रवार 7 फेब्रुवारी 2020 रोजी नागपूर येथून विमानाने सकाळी 11 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. सकाळी 11.05 वा. मोटारीने परभणीकडे प्रयाण. सायं 4.30 वा. परभणी येथून मोटारीने नांदेड विमानतळ येथे आगमन. सायं 4.35 वा. विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.
00000

Wednesday, February 5, 2020


अनुसूचित जातींच्या स्वयंसाहाय्यता बचतगटांना
90 टक्के अनुदानावर मिनि ट्रॅक्टरची योजना
अर्जातील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी 14 फेब्रुवारीची मुदत
नांदेड दि. 6 :-  अनुसूचित जातींच्या स्वयंसाहय्यता बचतगटांना 90 टक्के अनुदानावर मिनि ट्रॅक्टर योजना अर्जातील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी संपूर्ण मूळ कागदपत्रांसह सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन ज्ञानमाता शाळेसमोर नांदेड येथे प्रस्तुत शाखेस 14 फेब्रुवारी 2020 पर्यंत सादर करावीत, असे आवाहन तेजस माळवदकर सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे.    
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातर्फे  अनुसूचित जाती व नवबौद्ध  घटकांच्या  स्वयंसाहय्यता बचत गटांना 90 टक्के अनुदानावर  9 ते 18 अश्वशक्तीचे  मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने  यांचा पुरवठा करण्याची योजना कार्यान्वित झाली आहे. शासन निर्णय 8 मार्च 2017 अन्वये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसाहाय्यता बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्यासाठी लाभाचे हस्तांतर रोख स्वरुपात थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
या वर्षात ज्या बचत गटांनी मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने मिळविण्यासाठी अर्ज केला  होता त्या सर्व अर्जांची तपासणी केली असता अर्जात त्रुटी आढळून आल्या आहेत. या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी समाज कल्याण कार्यालयाकडून यापूर्वीच दोन वेळेस सर्व बचत गटांना त्रुटी पूर्ततेची संधी देण्यात आली होती. ज्या काही बचतगटांनी त्रुटीची पूर्तता अद्याप पर्यंत केली नाही अशा बचत गटांची  यादी कार्यालयाच्या सूचना फलकावर दर्शनी ठिकाणी लावण्यात आली आहे.
बचतगटांनी  त्रुटींची पूर्तता करण्यासाठी  नांदेड जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार ज्या बचत गटांनी त्रुटी पूर्तता करावयाची राहिली आहे त्या सर्व बचत गटांनी 7 ते 14 फेब्रुवारी 2020 या कालावधीत त्रुटींची पूर्तता करण्यासाठी अंतिम संधी देण्यात आली आहे. मुदतीनंतर आपला अर्ज अपात्र ठरवून ईश्वर चिट्ठीने निवड प्रक्रियेत आपल्या बचत गटाचा सहभाग नसेल तसेच आपला कुठलाही दावा, तक्रार किंवा विनंती मान्य करण्यात येणार नाही.      
00000



दहावी, बारावी परीक्षेसाठी हेल्पलाईन
नांदेड, दि. 6 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यावतीने फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसंदर्भात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी विभागीय मंडळ स्तरावर इयत्ता दहावीसाठी 02382- 251633 व इयत्ता 12 वीसाठी 02382- 251733 ही हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे.
विद्यार्थी पालक व शाळा प्रमुखांनी आपल्या अडीअडचणी विषयी दूरध्वनी क्रमांकावर किंवा समुपदेशकाचे नाव बी. एम. कच्छवे 9371261500 व बी. एम. कारखेडे 9860212898 या क्रमांवर संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय सचिव लातूर विभागीय मंडळ लातूर यांनी केले आहे.
00000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...