Friday, February 7, 2020


महिलांसाठी विनामुल्य अभ्यासिका
नांदेड दि. 7 :-जिल्ह्यातील बेरोजगार, स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या होतकरू महिला उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र, कैलासनगर वर्कशॉप रोड नांदेड यांच्या मार्फत विनामुल्य अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे.
या अभ्यासिकेमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलींसाठी ग्रंथालय विभागामध्ये प्रवेदेणे सुरु आहे. या ग्रंथालय विभागामध्ये वाचनासाठी विविध स्पर्धा परिक्षेची पुस्तके उपलब्ध असुन सर्व प्रकारची वर्तमानपत्रे वाचनासाठी  व्यवस्था करण्यात आली आहे. महिलांना स्वंतत्र्य स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची  व्यवस्था आहे. त्यासाठी अभ्यासिकेत मोफत प्रवेश देणे चालु असुन स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या होतकरू महिला उमेदवारांनी शासनाच्या या मोफत अभ्यासिकेचा जास्तीतजास्त लाभ घेऊन स्वबळावर उभे राहण्यासाठी प्रयत्नशील असावे, असे आवाहन प्र. सो. खंदारे सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता, मार्गदर्शन  केंद्र नांदेड यांनी केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...