Thursday, February 18, 2021

 

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्:मय

पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 18 :- स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्:मय पुरस्कारासाठी 3 मार्च 2021 पर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने केले आहे. नांदेड जिल्ह्यातील लेखकांना व प्रकाशकांना या योजनेंतर्गत प्रवेशिका सादर करणे सुलभ व्हावे म्हणून या स्पर्धेसाठी माहिती पुस्तिका व प्रवेशिकेची प्रत सामान्य शाखा-1 जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे ठेवण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.      

मराठी भाषेतील उत्कृष्ट वाड:मय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष 2020 करिता राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्:मय पुरस्कारांसाठीच्या प्रवेशिका जिल्हाधिकारी कार्यालयात (मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून) तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात 1 फेब्रुवारी 2021 ते 3 मार्च 2021 पर्यंत पाठविता येणार आहेत. दिनांक 1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र आहेत. या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिक सचिव महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई 400 025 यांच्या कार्यालयात तसेच मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता अन्यत्र संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात (सर्वसाधारण शाखा अथवा करमणूक शाखा) विनामूल्य उपलब्ध होतील. 

महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर ‘नवीन संदेश’ या सदरात ‘स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्:मय पुरस्कार- 2020 नियमावली व प्रवेशिका’ या शीर्षाखाली व ‘What’s New’ या सदरात ‘Late Yashvantrao Chavan State Literature Award -2020 Rules Book and Application Form’ या शीर्षाखाली व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या http://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशिका व नियमपुस्तिका उपलब्ध होतील. प्रवेशिका पूर्णत: भरुन आवश्यक साहित्यासह सचिव महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दिनांक 1 फेब्रुवारी ते 3 मार्च 2021 या विहित कालावधीत पोहचतील अशा बेताने पाठवाव्यात. लेखक / प्रकाशक या स्पर्धेसाठी प्रवेशिका दाखल करुन शकतात. मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यातील लेखक / प्रकाशकांनी पुस्तकांच्या दोन प्रतींसह विहित नमुन्यातील प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संसकृती मंडळ, रविंद्र नाट्य मंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी रोड, प्रभादेवी मुंबई – 4000 25 येथे पाठवाव्यात. मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन‍ जिल्हे वगळून अन्य ठिकाणच्या लेखक / प्रकाशकांनी संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये हे साहित्य 1 फेब्रुवारी ते 3 मार्च 2021 या विहित कालावधीत पाठवावे, असे आवाहन सचिव महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांनी केले आहे.   

लेखक / प्रकाशकांनी मंडळाकडे प्रवेशिका व पुस्तके पाठविताना सदर बंद लिफाफ्यावर / पाकिटावर ‘स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कार 2020 साठी प्रवेशिका’ असा स्पष्ट उल्लेख करावा. प्रवेशिका व पुस्तके स्विकारण्याचा अंतिम दिनांक 3 मार्च 2021 हा राहील. विहित कालमर्यादेनंतर (दि. 1 फेब्रुवारी 2021 ते 3 मार्च 2021) येणाऱ्या प्रवेशिका स्पर्धेसाठी स्विकारल्या जाणार नाहीत, असेही आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संसकृती मंडळाचे सचिव यांनी केले आहे.

000000

 

योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी

22 ते 26 फेब्रुवारी दरम्यान होणार तपासणी

नांदेड, (जिमाका) दि. 18:-  छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी असल्याने प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज बंद असणार आहे. ज्या वाहनांनी योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी पूर्वनियोजित अपॉईटमेंट घेतली आहे. अशा वाहनांची त्या पुढील आठवड्यात 22  ते 26 फेब्रुवारी दरम्यान वाघी येथील ब्रेक टेस्ट ट्रॅक येथे तपासणी होणार आहे. यांची सर्व वाहनधारकांनी नोंद घ्यावी असे, आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी केले आहे.

00000

 

 

सुरक्षित वाहतुकीसाठी

वाहतूक नियामांचे पालन करा

-         प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत

नांदेड (जिमाका) दि. 18 :- सुरक्षित वाहतुकीसाठी वाहतूक नियमांचे पालन करुन रस्ते अपघातातील जखमींना मदत करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले. नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने आयोजित 32 वा रस्ता सुरक्षा अभियानाचा समारोप येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात आज पार पडला, यावेळी अध्यक्षस्थानावरुन श्री. कामत बोलत होते.   

याप्रसंगी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. या अभियानानिमित्त विद्यार्थी व नागरिकांसाठी आयोजित केलेल्या निबंध व चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकाचे वितरण यावेळी करण्यात आले. 

जिल्ह्यातील रस्ते अपघात व अपघातील मृत्यू कमी करण्याच्या उद्दिष्टाने प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी याकाळात सायकल रॅली, रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, पथनाट्य, चित्ररथाद्वारे जनजागृती कार्यक्रम, प्रबोधन शिबिरे अशा विविध उपक्रमांद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. या अभियानात जिल्ह्यातील मोटर ड्रायव्हिंग स्कूल वाहन वितरक पीयूसी सेंटर फकीरा सेवाभावी संस्था विविध संघटना व संस्थांनी सक्रिय सहभाग घेतला. त्याबद्दल त्यांचा प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित विद्यार्थी व पालकांपैकी काहींनी उत्स्फूर्तपणे भाषणे केली. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती रुपाली येंबरवार व श्रीमती जयश्री वाघमारे यांनी केले तर सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत भोसले यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.राजेश गाजूलवाड, श्री.नंदकिशोर कुंडगीर, श्रीमती भलगे तसेच कार्यालयातील इतर अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

00000




Wednesday, February 17, 2021

 

महाडीबीटी प्रणालीवरील विद्यार्थ्यांच्या

 शिष्यवृत्तीबाबत आवाहन

औरंगाबाद, दि.17, (विमाका) :- ज्या विद्यार्थ्यांची महाडीबीटी प्रणालीवरील शिष्यवृत्ती जमा झालेली नाही, त्यांनी प्राचार्य किंवा लिपिक लॉगीन मधुन संबंधित विद्यार्थ्यांचा त्या शैक्षणिक अर्ज क्रमांक नमुद करुन खालील आवश्यक बाबी तपासुन घ्याव्यात असे आवाहन जलील शेख, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, औरंगाबाद यांनी जिल्ह्यातील सर्व प्राचार्यांना केले आहे.

 

सन 2018-19 पासून महाराष्ट्र शासनातर्फे सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी डीबीटी पोर्टल दिनांक 01.10.2018 पासून नव्याने सुरू करण्यात आले असुन त्यांचे हे संकेतस्थळ आहे. सदरील पोर्टल हे संचालक, माहिती व तंत्रज्ञान यांच्यातर्फे कार्यरत करण्यात आले आहे. सदर संकेतस्थळावरुन अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्रच्या प्रवर्गासाठी राबविण्यात येणाऱ्या मॅट्रिकेत्तर शिष्यवृत्ती/शिक्षण फी, परीक्षा फी योजना व इतर ऑनलाईन झालेल्या योजनांचे शैक्षणिक वर्ष 2019-20 मधील अर्ज स्वीकारण्यासाठी दिनांक 03.08.2019 पासून कार्यन्वित करण्यात आले होते. सन 2019-20 मधील विद्यार्थ्यांना भरलेल्या अर्जांवर कार्यवाही करण्यासाठी दिनांक 17 जुलै 2020 पर्यंत मुदत वाढविण्यात आली होती.

 

अर्जांवर सहायक आयुक्त, समाज कल्याण औरंगाबाद यांनी प्रणालीद्वारे ऑनलाईन मान्यता प्रदान केल्यावर आयुक्तालयस्तरावरुन त्यांचे देयके तयार करुन कोषागारातुन देय असलेली रक्कम पारीत करुन महाडीबीटी पोर्टच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेली आहे. सदर देय असलेली रक्कम ही पीएफएमएस या केंद्रभुत वितरण प्रणालीमधुन विद्यार्थ्यांच्या व महाविद्यालयाच्या बँक खात्यामध्ये थेट महाडिबीटी प्रणालीद्वारे जमा होणे अपेक्षित आहे. तद्पुर्वी पीएफएमएस प्रणालीमधून वितरण करण्यापूर्वी लाभार्थ्यांच्या आधार क्रमांक बँक खात्यास संलग्न असल्याचे या केंद्रभूत पडताळणी प्रणालीमधून मान्य झालेल्या पात्र लाभार्थ्यांचे आधार व बँक खात्याची पडताळणी करण्यात येते.

 

या पडताळणी प्रक्रियेस पीएफएमएस व एनपीसीएस यांच्याच स्तरावर विलंब होत असल्याचे विभागाच्या निदर्शनास आले आहे. याबाबत आयुक्तालयास्तरावरुन व शासनस्तरावरुन माहिती व तंत्रज्ञान संचालनालयास तसेच राज्यस्तरावरील पीएफएमएस व एनपीसीएस कार्यालयांना वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे.

 

या शिवाय देयक जनरेट झालेल्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्ती वितरण सद्यस्थितीत महाडीबीटी पोर्टल प्रणालीवरील व या प्रणलीद्वारे चालु असून सन 2019-20 या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची रक्कम आधारसंलग्न बँक खात्यात अद्याप जमा व्हावयाची आहे. सदरील रक्कम पीएफएमएस प्रणालीद्वारे वितरीत होण्यास खालील कारणांमुळे विलंब होत आहे, असे संबंधित विभागाकडून कळविण्यात आले आहे.

 

1) नॉन आधार अर्ज नोंदणी केलेल्या अर्जांमध्ये आधार क्रमांक अद्यावत नसणे.2) विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक त्यांच्या बँक खात्याशी संलग्न नसणे. 3) विद्यार्थ्याचे आधार क्रमांक इनक्टीव असणे. 4) विद्यार्थ्यांना व्हाऊचर रिडीमन करणे. 5) विद्यार्थ्यांच आधार संलग्न असलेले बँकेतील खाते बंद असणे. 6) विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न मोबाईल क्रमांक बंद असणे. 7) दुसऱ्या हफ्त्यासाठी महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांची उपस्थिती अद्यावत करण्याकरिता अर्ज प्रलंबित असणे.

 

तरी ज्या विद्यार्थ्यांची महाडीबीटी प्रणालीवरील शिष्यवृत्ती जमा झालेली नाही, त्यांनी प्राचार्य किंवा लिपिक लॉगीन मधुन संबंधित विद्यार्थ्यांचा त्या शैक्षणिक अर्ज क्रमांक नमुद करुन खालील आवश्यक बाबी तपासुन घ्याव्यात असे आवाहन जलील शेख, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, औरंगाबाद यांनी जिल्ह्यातील सर्व प्राचार्यांना केले आहे.

*****

 

जिल्ह्यात शुक्रवारी दारु विक्री बंद

नांदेड (जिमाका) दि. 17 :- जिल्ह्यात शुक्रवार 19 फेब्रुवारी 2021 रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सव साजरा होणार आहे. या दरम्यान जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था रहावी आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनुचित प्रकार घडू नये यासाठी शुक्रवार 19 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील दारु विक्रीचे व्यवहार पुर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केले आहेत. 

मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी 19 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील सर्व सीएल-3, एफएल-3, एफएल-2, एफएल/बिआर-2 व ताडी विक्रीच्या अनुज्ञप्त्याचे अंतर्गत व्यवहार पुर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, असेही आदेशात म्हटले आहे.

*****

 

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू

नांदेड (जिमाका) दि. 17 :- नांदेड जिल्ह्यात 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 4 मार्च, 2021 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात गुरुवार 18 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 4 मार्च 2021 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही. 

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

000000

 

24 कोरोना बाधितांची भर तर

21 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी 

नांदेड (जिमाका) दि. 17 :- बुधवार 17 फेब्रुवारी 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 24 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 11 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 13 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या  21  कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  

आजच्या 706 अहवालापैकी 679 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 22 हजार 930 एवढी झाली असून यातील 21 हजार 870 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 259 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 8 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 590 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.     

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये हदगाव कोविड रुग्णालय 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 16, खाजगी रुग्णालय 2, देगलूर कोविड रुग्णालय 1, किनवट कोविड रुग्णालय 1 असे एकूण 21 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95.37 टक्के आहे.   

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 4, किनवट तालुक्यात 4, उमरखेड 1, नांदेड ग्रामीण 1, लोहा 1 असे एकुण 11 बाधित आढळले.  ॲटीजन किट्स तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 9, किनवट तालुक्यात 4 असे एकूण 13 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 259 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 22, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 22, किनवट कोविड रुग्णालयात 16, हदगाव कोविड रुग्णालय 1, देगलूर कोविड रुग्णालय 2, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 132, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 30, हैदराबाद येथे संदर्भीत 1, खाजगी रुग्णालय 33 आहेत.   

बुधवार 17 फेब्रुवारी 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 162, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 88 एवढी आहे.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 19 हजार 674

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 92 हजार 332

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 22 हजार 930

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 21 हजार 870

एकुण मृत्यू संख्या-590

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी  (गृहविलगीकरण) बरे होण्याचे प्रमाण 95.37 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-2

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-1

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-395

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-259

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-8.          

0000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...