24 कोरोना बाधितांची भर तर
21 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी
नांदेड (जिमाका) दि. 17 :- बुधवार 17 फेब्रुवारी 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 24 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 11 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 13 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 21 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
आजच्या 706 अहवालापैकी 679 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 22 हजार 930 एवढी झाली असून यातील 21 हजार 870 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 259 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 8 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 590 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
आज बरे झालेल्या बाधितांमध्ये हदगाव कोविड रुग्णालय 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 16, खाजगी रुग्णालय 2, देगलूर कोविड रुग्णालय 1, किनवट कोविड रुग्णालय 1 असे एकूण 21 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95.37 टक्के आहे.
आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 4, किनवट तालुक्यात 4, उमरखेड 1, नांदेड ग्रामीण 1, लोहा 1 असे एकुण 11 बाधित आढळले. ॲटीजन किट्स तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 9, किनवट तालुक्यात 4 असे एकूण 13 बाधित आढळले.
जिल्ह्यात 259 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 22, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 22, किनवट कोविड रुग्णालयात 16, हदगाव कोविड रुग्णालय 1, देगलूर कोविड रुग्णालय 2, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 132, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 30, हैदराबाद येथे संदर्भीत 1, खाजगी रुग्णालय 33 आहेत.
बुधवार 17 फेब्रुवारी 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 162, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 88 एवढी आहे.
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची
संक्षिप्त माहिती
एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 19
हजार 674
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 92 हजार 332
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 22 हजार 930
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 21 हजार
870
एकुण मृत्यू संख्या-590
उपचारानंतर बाधित रुग्ण घरी (गृहविलगीकरण) बरे होण्याचे प्रमाण 95.37
टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-2
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-1
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-395
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-259
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-8.
0000
No comments:
Post a Comment