राज्य माहिती आयोग खंडपीठ औरंगाबादकडून
द्वितीय अपिलांवर नांदेडला सुनावणी कार्यक्रम
संकेतस्थळावर सुनावणी बोर्डाची माहिती प्रसिद्ध
नांदेड, दि.17, (जिमाका) :-राज्य माहिती आयोग खंडपीठ औरंगाबाद यांच्यावतीने येत्या 23, 24 व 15 फेब्रुवारी 2021 रोजी द्वितीय अपिलांची 350 विशेष सुनावणीचा कार्यक्रम नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आला आहे.
राज्य माहिती आयुक्त, राज्य माहिती आयोग खंडपीठ औरंगाबाद यांना प्राप्त होणाऱ्या द्वितीय अपिलांची लक्षणीय संख्या लक्षात घेता राज्य माहिती आयुक्तांनी नांदेड जिल्हयातील अपिलार्थीकडून प्राप्त होणाऱ्या द्वितीय अपिलांची सुनावणी नांदेड येथे घेण्यासाठी विशेष मोहिम प्रस्तावित केली आहे.
हा सुनावणी कार्यक्रम नियोजन भवन जिल्हाधिकारी
कार्यालय नांदेड येथे दिनांक 23, 24 व 25 फेब्रुवारी 2021 या कालावधीत घेण्यात
येणार आहे. द्वितीय अपिलांची संख्या सुमारे 350 सुनावण्या घेण्याबाबत सुचित केले
आहे. राज्य माहिती आयुक्त खंडपीठ औरंगाबाद यांनी द्वितीय अपिल प्रकरणाची माहिती https://sic.maharashtra.gov.in या संकेतस्थाळावर
सुनावणी बोर्ड तारखेनिहाय प्रसिद्ध केली आहे. अधिक माहितीसाठी नांदेड जिल्हा nanded.gov.in
या संकेतस्थळावर द्वितीय अपिल सुनावणी बोर्ड तारखेनिहाय प्रसिद्ध
करण्यात आला आहे. त्यानुसार संबंधित
कार्यालय अधिनस्त सर्व कार्यासन प्रमुख तथा प्रथम अपिलीय अधिकारी तसेच जनमाहिती
अधिकारी यांनी सुनावणी स्थळी अद्यावत माहितीसह व रोजनामा विहीत नमुन्यातील माहितीसह सुनावणीस्थळी उपस्थित राहण्याबाबत आयोगाच्या
कार्यालयामार्फत निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार व्दितीय अपिल सुनावणीस्थळी
कार्यालयाच्या संबंधीत अधिकारी / कर्मचाऱ्यांना सुनावणी प्रकरणात निश्चीत केलेल्या
दिवशी व वेळी उपस्थित राहण्याचे कळवून व जिल्हाधिकारी कार्यालयास अहवाल अवगत करण्यात
यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिले आहेत.
0000
No comments:
Post a Comment