वृत्त क्रमांक
जिल्हाधिकारी कार्यालयात 17 नोव्हेंबर रोजी ‘पेन्शन अदालत’
- सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तक्रारींचे निवेदन सादर करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 3 : महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या
पेन्शनविषयक तसेच अन्य प्रशासकीय अडचणींचे निराकरण करण्यासाठी मंगळवार, दि. 17 नोव्हेंबर 2026 रोजी
जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे पेन्शन अदालत आयोजित
करण्यात आली आहे.
या पेन्शन अदालतीमध्ये संबंधित
सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसंदर्भातील तक्रारी व अडचणी जाणून
घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी कार्यवाही करण्यात येणार आहे. यासाठी संबंधितांनी
17 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 1.30 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहून आपल्या तक्रारींचे
निवेदन सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी, नांदेड यांनी केले आहे.
******
No comments:
Post a Comment