वृत्त क्रमांक
तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वाराचे
राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष हरदीप सिंग गिल यांनी घेतले दर्शन
नांदेड (जिमाका), दि. 4 : राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष हरदीप सिंग गिल यांनी नांदेड येथील दौऱ्यात सुप्रसिद्ध तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा येथे गुरुग्रंथ साहिब यांचे दर्शन घेतले.
बाबा जीवनसिंग यांचे जन्मदिवस साजरा करण्यासाठी अमृतसर येथून विशेष रेल्वेने आणलेल्या सर्व संगतसोबत श्री. गिल यांनी तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वाराचे माथा टेकून दर्शन घेतले.
यावेळी तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा बोर्डाच्यावतीने राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष हरदीप सिंग गिल यांचा पारंपारिक पद्धतीने शाल, श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला. यावेळी सुरेश लोट, सरदार अवतारसिंग पहरेदार आदी उपस्थित होते.
***
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment