Thursday, August 6, 2026

वृत्त क्रमांक 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 

 नांदेड जिल्ह्यात 59 हजार 301 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण

नांदेड, दि. 6 ऑगस्ट :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत नांदेड जिल्ह्यात पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण सुरू असून, आतापर्यंत 59 हजार 301 शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. जिल्ह्यातील 96 हजार 772 पात्र शेतकऱ्यांपैकी 37 हजार 471 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप बाकी असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी दिली.

योजनेचा लाभ मिळावा यासाठी विशेष कार्यकारी सेवा सहकारी संस्था, ग्रामपंचायत, चावडी, बँक शाखा आणि तलाठी कार्यालय येथे पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. तसेच 14 हजार 156 शेतकऱ्यांकडे अद्याप अॅग्रीस्टॅक क्रमांक नसल्याने त्यांनी तातडीने अॅग्रीस्टॅक नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या पात्र शेतकऱ्यांना शासनाकडून कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. त्यानंतर बँकेकडून 'बेबाकी प्रमाणपत्र' मिळाल्यास संबंधित शेतकरी पुढील पीककर्जासाठी पात्र ठरणार आहेत. प्रशासनाने सर्व पात्र शेतकऱ्यांना यादीतील विशिष्ट क्रमांक, आधार क्रमांक, कर्जखाते क्रमांक आणि पोर्टलवरील कर्जरकमेची पडताळणी करून शक्य तितक्या लवकर आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.100                                                                                                                       दि.06-...