Thursday, July 16, 2026

वृत्त क्रमांक   

पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा  

नांदेड, दि. 16 जुलै : राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग सक्षमीकरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे नांदेड दौऱ्यावर असून त्यांचा शुक्रवार 17 जुलै 2026 रोजी नांदेड जिल्ह्याचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील. 

शुक्रवार 17 जुलै 2026 रोजी सकाळी 11.20 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून जिल्हाधिकारी कार्यालय नांदेडकडे वाहनाने प्रयाण. सकाळी 11.30 जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आगमन व नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत उभारलेल्या ईव्ही चार्जिंग स्टेशनच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती. स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड. दुपारी 12 वा. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थिती. स्थळ- जिल्हा नियोजन समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड. सोईनुसार नांदेड येथून छत्रपती संभाजीनगरकडे वाहनाने प्रयाण करतील.  

00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक   राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त २९  ऑगस्ट रोजी पदकप्राप्त खेळाडूंचा होणार सत्कार नांदेड(जिमाका), दि. २७ : महान हॉकीपटू मेजर ध्य...