Wednesday, July 1, 2026

वृत्त क्रमांक

प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे तालुक्याच्या ठिकाणी

शिकाऊ व पक्के अनुज्ञप्ती शिबिराचे आयोजन

नांदेड 1 जुलै :-  प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे शिकाऊ व पक्के अनुज्ञप्तीसाठी माहे जुलै ते डिसेंबर 2026 या महिन्यात तालुका शिबिर कार्यालयाचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरासाठी जागा उपलब्धतेच्या आधीन राहून ऑनलाईन अपॉईटमेंट महिना सुरुवात होण्याच्या 5 दिवस आधी कार्यालयीन वेळेत सुरु करण्यात येईल. तरी अपॉईटमेंट घेतलेल्या अर्जदारांनी यांची नोंद घेवून शिबिर कार्यालयास उपस्थित राहावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांतराव साळी यांनी केले आहे.

तालुकानिहाय कॅम्पचे ठिकाण व दिनांक पुढीलप्रमाणे आहे. कंधार येथे 3 जुलै, 3 ऑगस्ट, 3 सप्टेंबर, 5 ऑक्टोबर, 3 नोव्हेंबर, 2 डिसेंबर 2026 या दिवशी आहे. धर्माबाद येथे 6 जुलै, 6 ऑगस्ट, 7 सप्टेंबर, 7 ऑक्टोबर, 5 नोव्हेंबर, 4 डिसेंबर 2026 दिवशी आहे. किनवट  9 जुलै, 10 ऑगस्ट, 9 सप्टेंबर, 9 ऑक्टोबर,  12 नोव्हेंबर, 10 डिसेंबर 2026 या दिवशी आहे. मुदखेड येथे 13 जुलै, 13 ऑगस्ट, 11 सप्टेंबर, 12 ऑक्टोबर, 16 नोव्हेंबर, 14 डिसेंबर यादिवशी आहे. माहूर येथे 16 जुलै, 17 ऑगस्ट, 16 सप्टेंबर, 16 ऑक्टोबर, 18 नोव्हेंबर,  16 डिसेंबर या दिवशी आयोजन करण्यात येणार आहे. हदगांव येथे 20 जुलै, 20 ऑगस्ट, 21 सप्टेंबर, 21 ऑक्टोबर, 20 नोव्हेबर, 21 डिसेंबर यादिवशी आहे. धर्माबाद येथे 23 जुलै, 25 ऑगस्ट, 24 सप्टेंबर, 23 ऑक्टोबर, 25 नोव्हेंबर, 23 डिसेंबर या दिवशी आहे. हिमायतनगर येथे 27 जुलै, 27 ऑगस्ट, 28 सप्टेंबर, 28 ऑक्टोबर, 27 नोव्हेंबर, 28 डिसेंबर 2026 या दिवशी आहे. किनवट येथे 30 जुलै, 31 ऑगस्ट, 30 सप्टेंबर, 30 ऑक्टोबर, 30 नोव्हेंबर, 30 डिसेंबर 2026 या दिवशी आयोजन करण्यात आले आहे. यानुसार शिकाऊ व पक्क्या अनुज्ञप्ती साठी तालुक्याच्या ठिकाणी मासिक शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना #शे...